Home महाराष्ट्र देवळा येथे शिक्षण परिषद संपन्न

देवळा येथे शिक्षण परिषद संपन्न

216

 

 

नागेश खुपसे-पाटील
( सोलापूर जिल्हा प्रतिनिधी, मो. 77750 96293)

सोलापूर – अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयात धानोरा केंद्र अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची पहिली शिक्षण परिषद दि. २४ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाली. या शिक्षण परिषदेत विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात आली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. खोसे एस.जे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंदप्रमुख श्री. तट डी.डी, केंद्रीय मुख्याध्यापक श्री. जोगदंड टी.डी, श्री. गोविंदराव यादव हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कु. उत्कर्षा शितोळे व कु. साक्षी खामकर या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. या परिषदेत सुलभक म्हणून श्री. शेख आर.एम, श्री. गंगणे एस.एम, श्री. शेख ए.ए, श्री. वाघमारे एस.आर, श्री. बेले आर.डी यांनी काम पाहिले. परिषदेत पॅट महाराष्ट्र, विद्यार्थी उपस्थिती व गुणवत्त्ता, एक पेड माँ के नाम, शाळा बाहय मुले, शाळा व्यवस्थापन समिती नियुक्ती आदी विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. या परिषदेत धानोरा केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. हनुमंत पाडे यांनी केले. ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी विश्वरुपी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवळा येथील शिक्षकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here