Home महाराष्ट्र खुरेशी समाजाने जनावरे खरेदी- विक्री व्यवहार बंद केल्याचा परीणाम बाजारपेठेवर शेतकरी...

खुरेशी समाजाने जनावरे खरेदी- विक्री व्यवहार बंद केल्याचा परीणाम बाजारपेठेवर शेतकरी वर्गातुन संतप्त प्रतिक्रिया

324

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
खुरेशी समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर जनावरे खरेदी विक्री व्यवहार बंद केल्याने त्याचा परिणाम गंगाखेड बाजारपेठेवर दिसुन आला.
गंगाखेड शहरात शनिवार बाजारत खरेदी विक्री मार्केटवर याचा चांगलाच परिणाम दिसून आला आहे.
जनावराच्या खरेदी विक्रीवर अवलंबून असणाऱ्या काही शेतकऱ्यांना आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. वृद्ध झालेले गाय, बैल व म्हैस शनिवार बाजारात कोणीही शेतकरी खरेदी करण्यास तयार नाही.
काही शेतकरी वर्षानुवर्ष ही जनावरे पाळतात व अडीअडचणीला जवळच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतात परंतु कोणी शेतकरी याची खरेदी करत नसल्याने ती जनावरे कुरेशी समाज खरेदी करत असतो .परंतु हे मार्केट बंद असल्याने शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडला आहे.मुलांचे शिक्षण ,मुलांचा शैक्षणिक प्रवेश, पेरणीसाठी घेतलेले उधारीवर बी बियाणे याची परतफेड करण्यात शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गोवंश हत्या हा कायदा बंद करण्यात यावा व या निर्णयाच्या विरोधात शासनाने ठोस अशी पावले उचलून शेतकऱ्याची जी वृद्ध जनावरे आहेत ती कशाप्रकारे खरेदी विक्री केली जाईल याचाही निर्णय घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे. गंगाखेड शहरातील शनिवार बाजारावर या खरेदी विक्री बंदचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून शेतकरी वर्गात मोठा संताप निर्माण झाला आहे. काही संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवले आहेत. पाहुया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here