Home महाराष्ट्र डॉ.अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

डॉ.अण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

136

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या ४८ व्या.स्मृतिदिना निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सामूहिक अभिवादन करण्यात आले.गंगाखेड शहरातील बस स्थानक परिसरातील डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याजागी (दिनांक 18 जुलै शुक्रवार) रोजी डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नाम फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे अध्यक्ष रोहिदास लांडगे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करुन मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली.त्यानंतर सामूहिक अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित समाज बांधवांनी मनोगत व्यक्त केले. अभिवादन कार्यक्रमास मा.नगरसेवक चंद्रकांत खंदारे,शाम अवचार, पत्रकार पिराजी कांबळे, संपादक विलास लांडगे,बालाजी अवचार,चांदु शेळके,दता साळवे,किरण उफाडे,राम अवचार,गणेश अवचार, आदींसह समाज बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here