Home महाराष्ट्र लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या अध्यक्षपदीॲडव्होकेट रावसाहेब वडकिले यांची निवड

लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या अध्यक्षपदीॲडव्होकेट रावसाहेब वडकिले यांची निवड

143

 

 

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

गंगाखेड – सन 1997 पासून गंगाखेड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संघटना लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत वर्ष 2025 26 ची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली.
गंगाखेड येथील प्रसिद्ध विधिज्ञ, सर्वसामान्य जनतेला आधार देत त्यांना न्याय मिळवून देणारे खंबीर वकील, ॲडव्होकेट रावसाहेब वडकीले सर, यांची अध्यक्षपदासाठी निवड केली आहे. सचिव पदासाठी येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध व्यापारी महादेव गीते यांची निवड केली आहे, तसेच कोषाध्यक्ष पदासाठी गंगाखेड सीड फर्टीलायझर संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले, माऊली सेठ शिंदे यांची निवड झाली आहे. एक जुलै 25 पासून 30 जून 2026 असा यांचा कालावधी आहे.
येणाऱ्या वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,आरोग्य विषयक सेवा जनतेला पुरविण्यासाठी विविध शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,योगा -व्यायाम जनजागृती, युवाशक्ती प्रशिक्षण,अन्नदान,नारी सन्मान,ग्राम स्वच्छता, पर्यावरण रक्षण, याबाबतचे विविध उपक्रम क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येतील असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट रावसाहेब वडकीले यांनी केले.
सदरील बैठकीस लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य लॉयन, केशव देशमुख, दगडूशेठ सोमानी,प्राचार्य बालाजी ढाकणे, प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर,रामेश्वर तापडिया, संभाजी वाडेवाले सर, दत्तात्रय निलपत्रेवार,संजयशेठ दुधाटे, शिवाजीराव डोळे, ज्ञानेश्वर कापसे, संजय सेठ धुळे, प्रभाकरराव देशमुख, संजय तापडिया,ज्ञानेश्वर राजूरकर, प्रतापसिंग ठाकूर,विठ्ठल प्रसाद पवार सर, नंदकुमार भरड, डॉक्टर के पी गारोळे,डॉक्टर बालासाहेब मानकर, डॉक्टर किशोर कुगने,डॉक्टर ज्ञानोबा तुरणर,डॉक्टर ज्ञानोबा धुमाळ,डॉक्टर सुरेश सूर्यवंशी,डॉक्टर मंगेश शिरसाट, डॉक्टर पाराजी सोळंके,प्राध्यापक डॉक्टर राजीव आहेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथ ग्रहण सोहळा दिनांक 18 जुलै रोजी आयोजित केला आहे., अशी माहिती, नूतन झोन चेअर पर्सन – बाबासाहेब जामगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here