


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड/सातारा : शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली दीड वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे वतीने संघर्ष सुरू आहे.. राज्य सरकारने मंत्रिमंडळात या महामार्गाला मंजुरी देऊन भूसंपादनासाठी 20 हजार कोटी मंजूर केले आहेत त्यामुळे भूसंपादनाचे काम शासनाकडून गतिमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे..सांगली जिल्ह्यातील तिसंगी या गावात काल 27 जून रोजी मोजणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांना बाधीत शेतकऱ्यांनी रोखले आहे त्यांना प्रचंड मोठा विरोध करून मोजणीचे कोणतेही काम त्यांना करू दिले नाही आज दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू करीत असताना शेतकरी संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी तसेच शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आमची एक इंच जमीन महामार्गाला द्यायची नाही..कोणत्याही परिस्थितीत मोजणी करू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने कवठे महांकाळ येथील तहसीलदार अर्चना कापसे, पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील भूसंपादन अधिकारी यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.. कितीही दडपशाही केली तरी कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गाला जमीन न देण्याचा निर्णय सर्व बाधीत शेतकऱ्यांनी घेतला आहे.. पुन्हा सोमवारी मोठा पोलिस बंदोबस्त घेवुन येणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले..सांगली जिल्ह्यातील सर्व बाधीत शेतकरी एकजुटीने मोजणी कुठेच होऊ देणार नाहीत.. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग असताना हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त करून शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्याला समांतर महामार्गाची गरजच काय असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत याचे एकाही अधिकाऱ्यांच्या कडे नाही
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे वामन कदम , अमर शिंदे, शिवाजी शिंदे भूषण गुरव विष्णु सावंत महादेव नलावडे उमेश एडके, आदिक पाटील, विष्णू पाटील, प्रकाश टकले, सिध्देश्वर जमदाडे, नागेश कोरे रवी साळुंखे व बाधीत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














