Home गडचिरोली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले मृतक गावडे परिवाराला आर्थिक मदत….!

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले मृतक गावडे परिवाराला आर्थिक मदत….!

177

 

अहेरी : तालुक्यातील दामरंचा येथील शेतकरी लक्ष्मण पापय्या गावडे (वय 42वर्ष ) यांनी काल शुक्रवार रोजी दुपारी दरम्यान इंद्रावती नदीवर मच्ची पकडण्यासाठी घेले होते,मच्चीमार करतांना फिट आल्याने नदीच्या पाण्यात पडून दुःखात निधन झाले आहे.

गावडे परिवार अंत्यत गरीब असुन ते शेती व्येवासाय करून घर चालवत होते.घरचा मालक निधन झाल्याने गावडे कुटुंबावार आर्थिक संकट कोसळेले आहे.मृतक लक्ष्मण गावडे यांची पोस्ट मोडमसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले.

सदर घटनेची माहिती येथील कार्यकर्त्यांकडून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक श्री.अजय कंकडालवार मिळतच तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होऊन त्या गावडे परिवाराची भेट घेऊन त्या मृतक लक्ष्मण गावडे यांची पोस्ट मोडम होई पर्यंत उपस्थित राहून गावडे कुटुंबाला आर्थिक मदत केले.

दरम्यान कंकडालवार सांगितले की समोर कोणत्याही अडचण भासल्यास आपण सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगत गावडे कुटुंबाला मोठा धीर दिले.गावडे परिवारातील समस्त सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here