Home चंद्रपूर निवडणूक समोर बघता लोकप्रतिनिधी जिल्हा निर्मितीसाठी समोर सरसावतात!……आता लोकप्रतिनिधी बघ्याच्या भूमिकेत सुस्त,...

निवडणूक समोर बघता लोकप्रतिनिधी जिल्हा निर्मितीसाठी समोर सरसावतात!……आता लोकप्रतिनिधी बघ्याच्या भूमिकेत सुस्त, “कामा पुरती मामा” धोरण सुरु

556

 

 

रोशन मदनकर (उपसंपादक ) मो :- 8888628986

ब्रम्हपुरी :- नागपूर विद्यापीठातून शिक्षणाचे माहेर घर अशी ब्रम्हपुरीची ओळख, अनेक प्रसिद्ध दवाखाने, सर्वच सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना सोयीस्कर असलेली एकमेव तहसील आज जिल्ह्याच्या प्रतीक्षेत आहे. निवडणूक समोर बघता लोकप्रतिनिधी जिल्हा निर्मितीसाठी समोर सरसावतात परंतु आता लोकप्रतिनिधी बघ्याच्या भूमिकेत सुस्त आहेत.
ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण होणे हे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न आहे. हे खरे होणे याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. ब्रम्हपुरी जिल्हा झाला तर बेरोजगाराना रोजगार प्राप्त होईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा मध्ये भर पडेल. अनेक विकासकामांना चालना मिळेल. परंतु लोकप्रतिनिधीचे कार्य कामा पुरती मामा दिसू लागले आहे. ब्रम्हपुरी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी गल्ली ते दिल्ली पर्यंत पोहचले आहेत. रस्त्यावर धावणारे आज ब्रम्हपुरीचे नेते झाले आहेत. ब्रम्हपुरी क्षेत्रातील जनतेने लोकप्रतिनिधीना भरभरून प्रेम दिले आहे. परंतु त्याच लोक प्रतिनिधिनी ब्रम्हपुरीच्या जिल्हा निर्मितीकडे दुर्लक्ष केले आहे. ब्रम्हपुरी क्षेत्रातील नागरिकांनी जिल्ह्याची अपेक्षा सोडली आहे. आता पुन्हा लोकप्रतिनिधी केव्हा जिल्हाचा प्रश्न उठवतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here