Home चंद्रपूर पाहर्णी-तोरगाव(बूज) येथे अवैधरित्यांचे धंदे  जोमात!

पाहर्णी-तोरगाव(बूज) येथे अवैधरित्यांचे धंदे  जोमात!

345

 

संजय बागडे, नागभीड तालुका प्रतिनिधी मो. 91689 86378

इरव्हा(मौशी):-  नागभिड तालुक्यातील पाहर्णी परिसरात   तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील
तोरगाव(बूज) व नान्होरी परिसरात गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री अवैधधंदे  बोकाळली आहे. पोलीस यंत्रणेकडून डोळ्यावर हात ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे बिनधास्तपणे अवैधरित्या दारू विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र तोरगाव (बूज)तसेच पाहर्णी  परिसरात गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव (बूज) परिसर हा अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात अवैद्य दारू विक्री जोमात सुरू आहे. रस्त्याच्या कडेलाच पानटपऱ्या आणि घरांतून देशी, विदेशी दारूसह मोहफुलाच्या दारूची विक्री केली जात आहे. सोबतच कोंबड्यांच्या झुंजी,  यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस अवैध दारू विक्री व्यवसाय बोकाळत चालला आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारा कामगार वर्ग आणि युवक हे दारूच्या व्यसनात गुरफटत जावून अनेक संसार उघड्यावर पडत आहेत.

लग्न सीजन, सुट्टीचे दिवस, निवडणुका या काळात मोठा प्रमाणात अवैद्य दारू विक्री केल्या जाते.  पोलिसांच्या डोळ्यासमोरच अवैध दारू विक्री सुरू असते. त्यामुळे वेळच्यावेळी वरपर्यंत हप्ते पोहचत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. दरम्यान, अवैध दारू विक्री करणाऱ्यांची दहशत असल्याने कोणीही तक्रार करण्यास पुढाकार घेत नाही. पोलिसांनीच कठोर पावले उचलत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here