Home महाराष्ट्र धरणगाव येथे महात्मा जोतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त जाहीर व्याख्यान...

धरणगाव येथे महात्मा जोतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त जाहीर व्याख्यान तात्याराव महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समस्त भारतीयांसाठी प्रेरणादायी : उमेश मराठे ( व्याख्याते )

245

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : येथील समस्त माळी समाज पंच मंडळाच्या वतीने चोपडा येथील व्याख्याते उमेश शोभा महादू मराठे यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विचार मंचावर लहान माळीवाडा पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, मोठा माळीवाडा पंच मंडळाचे उपाध्यक्ष निंबाजी महाजन, व्याख्याते उमेश मराठे उपस्थित होते. सर्वप्रथम संत शिरोमणी सावता महाराज,सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर विचारमंचावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सामाजिक कार्यासाठी तात्याराव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखेच आपण आर्थिक, सामाजिक, बौद्धिक शैक्षणिक सक्षम झालो तरच त्यांचे विचार आपण पुढे पोहोचू शकतो. आपण शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत राहिलो तर येणारे पिढी आपल्याला माफ करणार नाही. खरा पुरोगामी म्हणजे न आवडणाऱ्या विचारांना विरोध करा, लढा द्या. तात्याराव सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समस्त भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन मराठे यांनी केले
याप्रसंगी समाजातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी प्रा.आर एन महाजन, गुलाबराव वाघ, ॲड संजय महाजन,डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटील, चौधरी समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, शिवव्याख्याते लक्ष्मण पाटील, शेतकी संघाचे संचालक गोपाल पाटील, सहसचिव डिगंबर महाजन, पत्रकार कडू महाजन, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, शिवसेना शहर प्रमुख विलास महाजन, सुकदेव महाजन, दामाजी महाजन, नगरसेवक कैलास माळी, विजय महाजन, दशरथ महाजन, सचिव गोपाल माळी, राजेंद्र वाघ, हेमंत माळी, योगेश महाजन, अमोल महाजन, डॉ.नरेंद्र पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, समाज पंच मंडळ सदस्य, सामाजिक – शैक्षणिक – राजकीय – पत्रकारिता – साहित्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी यांनी केले तर आभार आर डी महाजन यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील युवक मंडळ नितेश महाजन, नरेंद्र महाजन, रामनाथ महाजन, अमोल माळी, सोपान माळी, मनोज माळी, गुलाब महाजन, निवृत्ती माळी, रघुनाथ महाजन, कैलास महाजन यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here