Home महाराष्ट्र निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केल्यामुळे अंकुश घारड यांच्यावर हल्ला ! ...

निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केल्यामुळे अंकुश घारड यांच्यावर हल्ला ! ठेकेदाराचा मनमानी कारभार ; कोट्यावधी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ! नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत !

137

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी नगर परिषद क्षेत्रामध्ये राज्य शासनाने मोर्शी शहर विकासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत मोर्शी नगर परिषदेला रस्ते बांधकामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला त्यामध्ये प्रभाग क्र. ९ मधील अमरावती अप्रोच रोड ( परशुराम मंगल कार्यालय) ते सुधाकर माकोडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस गटारीचे काम करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे कामाकरीता ४ कोटी ५२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र, नगर परिषदेमार्फत करण्यात येत असलेले काम हे निकृष्ट दर्जाची होत असल्याबाबत अंकुश घारड यांनी सादर कामाची तक्रार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे २६ मार्च रोजी दाखल केलेली होती. त्या तक्रारीवर प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

संबंधित ठेकेदाराने दिनांक १० एप्रिल रोजी सदर रस्त्याचे काम सुरू केले असता संबंधीत ठेकेदाराचा सुपर सुपरवायझर शाहिद शेख याने अंकुश घारड यांना आमच्या कामाची तक्रार का केली म्हणून अंकुश घारड यांच्यावर हल्ला करून मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे अंकुश घारड यांनी पोलिस स्टेशन मोर्शी येथे रिपोर्ट दिला असता सुपरवायझर शाहिद शेख यांच्या विरुद्ध ११५ (२), ३५२, ३५१(२), ३५१(३), अन्वये मोर्शी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉलनी परिसरातील कामाची सुरुवात मागील चार महिन्यापासून केली असून संपूर्ण रस्ता हा खोदून ठेवलेला आहे कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना येणे जाण्याकरिता मोठ्यात प्रमाणात त्रास होत असून खोदलेल्या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने तात्काळ काम सुरू सुरू करून निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामावर कारवाई करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली होती तरीही नगर परिषद प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्यामुळे संबंधित ठेकेदार आमच्यावर हल्ला करून आमचा जीव घेण्यासाठी ही मागे पढे पाहत नसेल तर यांच्यावर प्रशासनातर्फे उच्चस्तरीय चौकशी करून आम्हाला न्याय मिळाल्या शिवाय मी स्वस्त बसणार नाही. अंकुश घारड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here