Home महाराष्ट्र कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ! बेताल वक्तव्य करणाऱ्या...

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ! बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्याचा शेतकऱ्यांनी केला निषेध व्यक्त !

345

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजप- युती सरकार सोडत नाही. माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न-साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का? असा प्रश्न विचारून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमान केल्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना कृषिमंत्री कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. खरे तर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देतांना शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रमाणे अत्यल्प नुकसान भरपाई मिळते. काही शेतकऱ्यांना तर ती मिळतच नाही. त्यातही पीक विम्याची रक्कम महाराष्ट्राच्या जनतेच्या कराच्या रकमेतून दिली जाते. मंत्र्यांच्या खिश्यातून दिली जात नाही. त्यामुळे मंत्र्यांनी अहंकारात राहून अशे बेताल वक्तव्य करु नये. भाजप युती सरकारमधील काही मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना नेहमी अपमान करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना घरी पाठवावे अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे रास्त दाम दिले असते, त्यांची लूट केली नसती, तर त्यांना अशा दीडदमडीच्या योजनांची कोणतीही आवश्यकता भासली नसती, ही बाब कृषी मंत्र्यांनी लक्षात ठेवावी. शेतकऱ्यांसाठी किंवा श्रमिकांसाठी राबवण्यात येत असणाऱ्या योजना, शेतकरी शेतमजुरांच्या कष्टाच्या पैशातून भरलेल्या सरकारी तिजोरीतूनच राबवण्यात येतात. कृषिमंत्र्यांच्या किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांच्या खासगी मालमत्तेच्या पैशातून या योजना राबवण्यात येत नाहीत ही बाब सुद्धा कृषिमंत्र्यांनी समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here