Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालयात माजी विद्यार्थी आणि पालक सभा संपन्न

ग्रामगीता महाविद्यालयात माजी विद्यार्थी आणि पालक सभा संपन्न

213

चिमूर- ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 5 एप्रिल 2025 रोज शनिवारला माजी विद्यार्थी आणि पालक-शिक्षक सभा आयोजित करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री सचिन भरडे, पालक प्रतिनिधी श्री महादेव डेहारे आणि श्री कुलदीप पिंपळकर मंचावर उपस्थित होते. या सभेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि उपलब्ध सोयी सुविधा या विषयावर चर्चा करण्यात आली. काही क्षेत्रात सुधारणा अपेक्षित असून भविष्यात ते पूर्ण केल्या जाईल असा आश्वासन प्राचार्यांनी पालकांना दिले. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने माझी विद्यार्थ्यांची भूमिका हे महत्त्वाचे असते, करिता माजी विद्यार्थ्यांनी सुचविलेले नाविन्यपूर्ण कल्पनांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. या सभेचे आयोजनासाठी पालक शिक्षक मंडळाचे समन्वयक डॉ. बिजनकुमार शील, माजी विद्यार्थी मंडळाचे समन्वयक प्रा. नागेश ढोरे, ग्रंथालय प्रमुख प्रा. संदीप मेश्राम, प्रा. रोहित चांदेकर, श्री निखिल भालेराव आणि श्री मनसारामजी घोडमारे यांनी विशेष प्रयत्न केले. या सभेत महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here