Home महाराष्ट्र आर्थिक साक्षरतेतून महिला सक्षमीकरणावर ग्रामगीता महाविद्यालयात वेबिनार

आर्थिक साक्षरतेतून महिला सक्षमीकरणावर ग्रामगीता महाविद्यालयात वेबिनार

144

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.12मार्च):- ग्रामगीता महाविद्यालयात महिला निवारण समितीच्या अंतर्गत दिनांक 11 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारचा विषय ‘आर्थिक साक्षरतेतून महिला सक्षमीकरण’ हा होता. विद्यार्थिनींनी आणि महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनातून बचत करून योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करावी याबाबत कु. गौरी गीत (को-ऑपरेट ट्रेनर) यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी या विषयी सुद्धा सखोल माहिती दिली.

या वेबिनारचा प्रमुख उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा होता. वेबिनारच्या अध्यक्षा म्हणून ग्रामगीता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले उपस्थित होत्या.या वेबिनारचे आयोजन प्राध्यापक डॉ. निलेश ठवकर आणि डॉ. प्रणाली टेंभूर्णे यांनी एक्सप्लेन ग्लोबल स्किल व ग्रामगीता महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने केले. या वेबिनारमध्ये 100 हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला तसेच महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि यशस्वी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here