Home महाराष्ट्र मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न रुग्णांची मोफत बीपी शुगर तपासणी...

मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न रुग्णांची मोफत बीपी शुगर तपासणी व फराळाची व्यवस्था

208

 

 

अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड:-
शहरातील गीता मंडळ येथे (दिनांक 10 मार्च सोमवार) रोजी एकदिवसीय मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसीटीच्या वतीने करण्यात आले होते.या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.किशन गारोळे, व्यापारी बद्रिनारायण तोतला उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करून शिबिरास सुरुवात करण्यात आली शिबिरामध्ये एकूण 151 रुग्णानी आपली नोंदणी करत डोळ्याची तपासणी करून घेतली परभणी येथील लॉयन्स रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉ.करण मोरे यांनी रुग्णांची उत्तमपने तपासणी करून निदान केले तपासणी केलेल्या 151 रुग्णांपैकी 22 रुग्णांच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे निर्देशनास आले या सर्व रूग्णांची शुगर व बिपीची मोफत तपासणी तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आली होती रुग्णांची शस्त्रक्रिया परभणी येथील लॉयन्स रुग्णालयात मोफत मध्ये करण्यात येणार असून सर्व रुग्णांनी परभणी येथील लॉयन्स रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा अजून बरेच रुग्ण राहिले असून त्यांनी परभणी येथील रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीचे अध्यक्ष जगदीश तोतला, डॉ.करण मोरे यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमासाठी अध्यक्ष जगदीश तोतला, सचिव भगत सुरवसे, कोषाध्यक्ष अभिनय नळदकर, झोन चेअरपर्सन अतुल गंजेवार,कॅबिनेट ऑफिसर गोविंद रोडे, उपाध्यक्ष बंडू घुले, मकरंद चिनके, प्रकाश घन, अतुल तुपकर,उमेश पापडू, महेंद्र वरवडे, महेमूद शेख आदी लॉयन्स सदस्यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here