Home महाराष्ट्र महिलांनी थोर महापुरुषांचे विचार अंगीकारावे. – डॉ. शारदा प्रवीण येरमे 

महिलांनी थोर महापुरुषांचे विचार अंगीकारावे. – डॉ. शारदा प्रवीण येरमे 

437

▪️ स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.9मार्च):- स्मार्ट ग्राम मंगी (बु) व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंगी ( बु.) च्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माझी वसुंधरा 5.0 ची शपथ घेऊन करण्यात आली. गावातील विविध क्षेत्रातील उत्तम कार्य करणाऱ्या प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगी(बु) चे सरपंच शंकर तोडासे, महिला दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शक डॉ. शारदा प्रवीण येरमे प्राध्यापिका (H.O.D.) शासकीय मेडिकल कॉलेज चंद्रपूर, तंटामुक्त समिती सभापती परशुराम तोडासे, शाळा व्यवस्थापन समिती सभापती सुरेशजी सिडाम, ग्रामपंचायत सदस्या जंगुताई गेडाम, सोनाली कोडापे, पेसा समिती अध्यक्षा संगीता कोडापे, कांताताई सुरपाम, अंगणवाडी सेविका शारदाताई क्षीरसागर, भीमबाई कनाके, स्वातीताई आडे, शाळेचे मुख्याध्यापक ऋषी मेश्राम , ग्रामपंचायत सचिव अनिल नारनवरे व सत्कारमूर्ती जंगुताई देवराव पेंदोर आशा वर्कर (रांजीगुडा) छायाताई सातपुते बचत गट संघ अध्यक्ष (खैरगुडा), सुरेखाताई मंगाम पेसा मोबीलाईजर मंगी खुर्द, शिल्पाताई कोडापे बचत गट संघ अध्यक्ष मंगी बु. मंदाताई मत्ते आशा वर्कर मंगी बु. या महिलांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. शारदा येरमे यांनी आपल्या मनोगतात महिलांना धाडशी होण्याचा,स्वतःचे काम स्वतः करण्यासाठी तयार होण्याची मौलिक माहिती दिली हिंदू कोड बिलाचा उल्लेख करीत महिलांना आपल्या अधिकाराबद्दल माहिती दिली.. अध्यक्ष महोदय यांनी महिलांना सन्मानित केले व गावविकासासाठी महिलांचा मोलाचा वाटा आहे हे बोलून दाखवल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर झाडे विषय शिक्षक यांनी केले तर आभार कु. वनिता तुरारे सहा. शिक्षिका यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ऋषी मेश्राम, सहा शिक्षक पंडित पोटावी मारोती चापले कु. वनिता तुरारे , सुधीर झाडे ग्रामपंचायत कर्मचारी नितीन मरस्कोले, दिनेश राठोड व सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here