


युती सरकारने महिलांना दरमहा पंधराशे दिले. म्हणून महिलांनी पैसे देणाऱ्याला मत दिले. म्हणजे महिलांनी मत विकले. या महिला बहुमोल मत फक्त पंदराशे रूपयात विकत असतील तर मताचा अधिकार देणे उचित ठरते का? असे केल्याने लोकशाही टिकेल का? हुकुमशाहीत महिला सुरक्षित राहातील का?
युती सरकार मधील लांडगा, कोल्हा, बिबट्यांनी विकासासाठी जमा केलेला पैसा जर असा मतांसाठी खिरापत वाटला तर ते सरकार बनवण्यासाठी, सरकार चालवण्यासाठी लायक नाहीतच. आणि ज्या महिलांनी पैसे घेऊन मत दिले त्यासुद्धा मतदानासाठी लायक नाहीतच. गरीबी असली म्हणून काय झाले? मत अशी विकण्याची वस्तू आहे का?
असेही मत हे मशीन मधे पडते. ते कुठेही जाते. यापुढे तर मतदारांनी मतदान केंद्रावर येऊ नये. त्रास घेऊ नये. तुमचे मत आम्हीच नोंदवून घेऊ. असे फर्मान या भाजप युती सरकारने काढले तर काय करणार?आले मोदींच्या मना, तेथे कोणाचे चालेना!सुरूवात झाली आहे. आमच्या जळगाव मधे मतदार बुथवर येण्याआधीच अनेकांचे मत नोंदवले गेले होते. बुथवरील अधिकारी अभय राणेला म्हणाले, जा घरी. आम्ही तुमचे मत नोंदवून घेतले. हे प्रकरण गुपचूप राहिले नाही. तर त्या तरूणाने तेथेच त्याच क्षणी आक्षेप नोंदवला.तो कोणीही नोंदवून घेतला नाही. व्हिडीओ बनवून व्हायरल केला. कोणीही दखल घेतली नाही. ही हुकूमशाहीची सुरूवात आहे. झाली आहे. भाजप युती चे नेते मॉक ड्रील करीत आहेत. सर्व्हे करीत आहेत,बघू तर खरे!लोक काय प्रतिक्रिया देतात. उठाव करतात कि चूप बसतात.मी तर बोंबललो. लोक चूप बसले. आमदार भोळे खुष झाले.यावरून निष्कर्ष काढला जाईल कि, मतदारांचे मत परस्पर नोंदवून घेतले तर कोणालाही चुकीचे वाटत नाही. तर मग,ही पद्धत जनरलाईज होऊ शकते.
मोदींना पुन्हा पुन्हा सत्ता सोपवली तर यापुढे मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडू नये. निवडणुक सुद्धा एक फार्स ठरणार आहे. फक्त देखावा. मतदारांना हे पाहाण्याची, सहन करण्याची सवय लागली तर मग काय, हम करे सो कायदा!
असे झाले आणि महिलांना फुकटचे पंदराशे देणे बंद केले तर ? आज तरी वंचित महिला कैमेरासमोर येऊन बोलतात. हे सुद्धा बंद होईल. मग कसले पंदराशे आणि कसले मतदान? जादा शहाणपट्टी नहीं, गोली मारो भेजेमे. अशीच गोळी गांधीजींना मारली. नंतर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना गोळी मारली. काय करून घेतले?जब पोलिस भी उनकी और जस्टिस भी उनका. तब गोली उनकी और सर तुम्हारा होगा. सिधा स्वर्ग में प्रमोशन. सामने खडा सैतान. जागते रहो इन्सान!
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२














