


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.2फेब्रुवारी):-आजच्या तरुण पिढीने शिक्षण घेत असतानाच स्वतःला आत्मनिर्भर कसे होता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करावा. केवळ डिग्री घेऊन आज उपयोगाचे नाही तर डिग्री सोबतच तरुणांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे आणि कुटुंबाचा व देशाचा आधार बनले पाहिजे असे मत प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब आंधळे यांनी मांडले.गंगाखेड येथील कै सौ शेषाबाई सीताराम मुंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मौजे कासारवाडी येथे विशेष शिबिराची सांगता (दि.2 मार्च रविवार) रोजी करण्यात आली.
या शिबिरात दि.24 फेब्रुवारी ते दि 02 मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इतर कार्यक्रमसोबतच या शिबिरात ग्रामीण भागातील महिलांना शिवणकाला प्रशिक्षणाचेही मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबीर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याणकारी व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सेवाभाव रुजवण्यासाठी व बौद्धिक सांस्कृतिक शैक्षणिक व विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन व तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. वाचन चावडी, डिजिटल लिटरसी,स्कुल कनेकट इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले होते.
या शिबिराच्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब आंधळे तसेच कासारवाडी गावच्या सरपंच सौ.सुनिता बबनराव गुट्टे,मुरलीधर मुंढे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा.डॉ.राजीव आहेरकर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी प्रयत्न केले शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.














