Home महाराष्ट्र पुराणातील वांगी आणि इतिहासाचे चुईंगम!

पुराणातील वांगी आणि इतिहासाचे चुईंगम!

203

काही बिनडोक लोक आण्णा हजारे यांचेवर आरोप करतात.कि हे भाजपचे हस्तक आहेत.जर तसे असेल तर त्यांनी स्वतः कांग्रेस चे हस्तक बनून काम केले पाहिजे. आण्णा इतकेच हात पाय डोके मेंदू प्रत्येकाला आहेच.तर तो चालवला पाहिजे. पण जे संशयी वृत्तीचे, निष्क्रिय लोक आहेत ते कोणालाही काहीही दोष देऊन आनंद मानतात.त् याऐवजी आण्णा हजारे यांना भेटून खात्री करून घेतली पाहिजे कि, ते कोणाकोणाचे हस्तक आहेत?

    जे आण्णा हजारे यांनी उघड उघड काम केले त्याचा अभ्यास,परिणामांचा अभ्यास न करता जे माहिती नाही, खात्री नाही त्याची मात्र चर्चा करतात.उचलली जीभ लावली टाळूला.

   असाच प्रकार गांधी नेहरू बाबत मुर्ख लोक करतात.द्वेश पसरवतात. माथी भडकवतात. इतिहासाचा अभ्यास, सोबत तार्किक शक्यतांचा विचार न करता म्हणतात कि,फाळणीला जबाबदार हेच आहेत. जसे देश म्हणजे एक बिस्कीट आहे, अर्धे याला आणि अर्धे त्याला. दोन देशांची फाळणी होतांना किती यातना होतात, वेदना होतात याचा अनुभव पाकिस्तान, बांगलादेश फाळणी वरून आला आहे. फाळणीपुर्वी खूप नरसंहार झाला. अत्याचार, बलात्कार झाला.याचा इतिहास तर ताजा आहे. १९७१ चा.आताच मणिपूर मधे फक्त दोन जमाती मधील आरक्षणबाबतचा वाद हिंसाचार, अत्याचार, बलात्कार पर्यंत पोहचला आहे. तर मग भारतात गांधी विरोधी लोकांची सत्ता आहे. वाद का मिटवत नाहीत?काही वर्षांनी बिनडोक माणसे म्हणतील, हा नरसंहार ,हा अत्याचार, हा बलात्कार नरेंद्र मोदींनी घडवून आणला होता.तेंव्हा यांची उत्तरे कशी देणार?जर खरी उत्तरे द्यायची असतील तर अशा लोकांनी आधी मणिपूर मधे जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.का आणत नाहीत?असे मोदींना भेटून विचारले पाहिजे.देश सशक्त असतांना प्रधानमंत्री अशक्त कसे काय?

    अनेक बिनडोक लोक इतिहासातील घटनाचे उलट सुलट दिशेने अर्थ लावतात.आपल्या सोयीनुसार, आपल्या जातीला, आपल्या धर्माला अनुसरून अर्थ लावतात.जाती धर्मात तेढ निर्माण करतात. कदाचित तेढ निर्माण करून, आग लावून पोळी शेकण्याचा उद्देश असू शकतो.

    कोणतीही घटना, युद्ध वगैरे घडते, त्यांचे प्रत्यक्षदर्शी विविध अंगांनी पाहातात.ज्याला जितके दिसते तितकाच तो त्या घटनांची जुळवणी करतो.ढाचे के आधारपर कहानी लिहीतो. असे एखादे पुस्तक हाती पडले कि वाचकांच्या डोक्यावर, मेंदूवर, विचारांवर परिणाम होतो.जसा परिणाम झाला तशी भाषा बोलतो. याच घटनेवर आणखी कोणी दुसऱ्याने पुस्तक लिहिले तर ते तिसरा कोणी वाचतो.तसा त्या वाचकावर परिणाम होतो. तशी भाषा तो बोलतो. म्हणजे घटना एकच अणि अर्थ वेगळे. असे का होते? कारण एकच बाजू पाहिली,वाचली आणि तेच तुणतुणे वाजवणे.

      आता फक्त बिनडोक नव्हे, अर्धशिशी लोक सुद्धा इतिहासातील घटनांचा सोयीनुसार अर्थ लावून वाद घालत आहेत. पण वर्तमानातील घटनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. इतिहासातील घटना तशाच वर्तमानातील घटना. पण आजचे इतिहासकार, साहित्यिक आपल्या सोयीसुविधांचा विचार करून,किंवा लाभ घेऊन या घटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत.असे भयग्रस्त आणि लोभग्रस्त लोक वर्तमानातील घटनांचा अभ्यास करण्यासाठी मेंदूचा वापर करीत नाहीत. वर्तमानाला घाबरलेली आणि इतिहासावर चर्वण करणारी माणसे बुद्धिमान, उच्चशिक्षित, प्रामाणिक नसतातच.

    गांधीजी त्यावेळच्या वर्तमान विरोधात लढले. जयप्रकाश नारायण आणि आण्णा हजारे त्यावेळच्या वर्तमान विरोधात लढले. पण नाटकवाले, सिनेमावाले, प्रवचनकार, किर्तनकार, साहित्यिक मात्र पुराणातील किंवा इतिहासातील लढाई लढत आहेत. ही भयग्रस्त आणि भुकग्रस्त मानसिकता आहे.बिनडोक लोकांना आपसात भिडवून, लढवून मारण्याचा त्यांचा उद्देश असू शकतो.

    वर्तमानाचे भान न ठेवता इतिहासाचे चुईंगम चघळणे हे भित्रे पणाचे लक्षण असते.वर्तमानाकडे दुर्लक्ष करण्यासाठी पुराणांतील वांगी खाणे हे पोरकटपणाचे लक्षण असते.

    इतिहास वाचला पाहिजे.पण प्रेरणा घेण्यासाठी. पुराण वाचले पाहिजे. पण ज्ञान घेण्यासाठी.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here