


✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.25फेब्रुवारी):-ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल व सनराइज् इंग्लिश प्रायमरी स्कूल राजुरा ही शाळा राजुरा तालुक्यात विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास नावाजलेली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देण्यात आलेत्यावर त्यांनी प्रतिकृती तयार करून पालकांसमोर त्याचे प्रदर्शन व स्पष्टीकरण दिले.
कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित पालक वर्गाने मुलांना त्यांनी बनवलेल्या प्रतिकृती विषयी माहिती विचारली असता मुलांनी त्यांना सर्व माहिती समजावून सांगितली.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून सिंगापूर पॅटर्न वर आधारित शिक्षण या शाळेतून दिले जाते. प्ले स्कुल ते वर्ग एक पर्यंतचे वर्ग या शाळेत असून अगदी लहान मुलं अभ्यासा व्यतिरिक्त रंग, आकार, दिवस, वार, महिने तसेच प्रत्येक संस्कृतीवरील विविध सणसमारंभ प्रत्यक्षपणे उपक्रमाच्या माध्यमातून राबवून त्याविषयीची माहिती अनुभवतात.
बालवयातच हसत-खेळत व विविध उपक्रमांच्या साह्याने शिक्षण देणारी ही शाळा अल्पावधीतच नावारुपास आली आहे. याकरिता या शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि सौ . जयश्री मालेकर तसेच केंद्र संचालक ऍड . मनोज काकडे व ब्रँच इंचार्ज शुभांगी धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती सिंग , आयेशा कुरेशी, फिजा शेख, मानसी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेण्यात येतात. याकरिता ममता व अर्चना सुषमाताई या मदतनीस चे सहकार्य लाभले . 
या कार्यक्रमांमध्ये पालकांनी समाधान व्यक्त करीत शाळेमध्ये विविध उपक्रमातून मुलांना शिक्षण दिल्या जाते याबाबत स्तुती केली.














