Home महाराष्ट्र गोरकनाथ धाकपाडे यांचा दिल्ली येथे सन्मान

गोरकनाथ धाकपाडे यांचा दिल्ली येथे सन्मान

217

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.24फेब्रुवारी):-नुकत्याच देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा मंचावर निमंत्रित असणारे कवी गोरकनाथ धाकपाडे यांनी आपली ‘अवेळीचं येणं’ ही कविता सादर केली. या कवितेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गंगाखेड तालुक्यातील खळी येथील रहिवाशी असणारे कवी धाकपाडे हे सहा.प्राध्यापक म्हणून कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड येथे कर्तव्य बजावतात त्यांनी दिल्ली येथे ‘अवेळीचं येणं’ या कवितेतून शेतकऱ्याची करुण कहाणी मांडली.कविकट्टा मंच्याचे अध्यक्ष राजन लाखे व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

या सोबतच खुल्या विचारपीठावर धाकपाडे यांना आपली ‘बाई’ ही कविता सादर करण्याची संधी मिळाली. या कवितेला ही शरद गोरे यांनी कवी धाकपाडे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.जेष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपल्या कविता सादर करुन कवी धाकपाडे यांनी छाप पाडली आहे.ते ग्रामीण कवी म्हणून आपली ओळख निर्माण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here