Home गडचिरोली सोमनपल्ली येथील घटनेचा खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे कडून निषेध ; दोषीवर...

सोमनपल्ली येथील घटनेचा खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे कडून निषेध ; दोषीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या पोलीस विभागाला सूचना

278

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23फेब्रुवारी):-चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रवासी निवाऱ्यावर महामानम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एका अज्ञात व्यक्तीने अर्वांच्य लिखाण केले, त्यामुळे सोमनापल्ली – येणापूर परीसरातील गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून गावाकऱ्यांनी सदर घटनेचा निषेध करून सदर अज्ञात आरोपी व्यक्तीला पकडून कठोर शिक्षा करण्याच्या मागणीला घेऊन निषेध आंदोन करण्यासाठी आयोजित बैठीकीस गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर कोणत्याही जाती धर्मातील महापुरुष हे आपल्यासाठी आदर्श आहेत, त्यांच्या विषयी अर्वांच्य भाषा वापरने किंवा त्यांच्या विषयी अपमानास्पद लिहिणे निंदनीय आहे, या मधील अपराधी व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भावना खासदार डॉ. किरसान यांनी व्यक्त केली. दरम्यान खासदार डॉ. किरसान यांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याशी भ्रमनध्वनी द्वारे चर्चा करून सदर घटनेचा तातडीने तपास करून दोषीवर कठोर शिक्षा करण्याच्या सूचना दिल्या व गावाकऱ्यांना संवैधानिक मार्गांनेच निषेध व्यक्त करण्याचे सांगितले. 

               यावेळी बैठीस जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमानंद (मुना) गोंगले, येणापुर अध्यक्ष जयसुक गेडाम, अँड.दिनेश राऊत , निनाद देठेकर सोमनपल्ली , प्रीतम घोनमोडे वायगाव, जितु झाडे सगणापुर, परिजन दहीवले, मंगलदास चापले, प्रमोद उमरे पी.जी उंदिरवाडे, आनंद गोडबोले,सुनील गोवर्धने,राजू राऊत, नामदेव मेश्राम, काजल मेश्राम सह सगनापुर , चकं न. 2 ,आंबोली, वायगाव,सोमणपल्ली, अड्याळ, किष्ठापुर, मुधोली रीट, कोणसरी येथील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here