Home लाइफस्टाइल शब्दगंधच्या शैक्षणिक कार्य गौरव पुरस्काराने डॉ शितल धरम सन्मानित

शब्दगंधच्या शैक्षणिक कार्य गौरव पुरस्काराने डॉ शितल धरम सन्मानित

221

✒️राहुरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राहूरी(दि.22फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित 16 वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन,अहिल्यानगर या ठिकाणी नुकतेच पार पडले. याप्रसंगी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी चे श्री साईबाबा महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. शितल अरविंद धरम यांना शब्दगंध शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या “अहमदनगर जिल्ह्यातील कम्युनिस्ट चळवळ : स्वातंत्र्योत्तर (इ.स. 1947 ते 1990) या विषयावरील संशोधन कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

साहित्यनगरी अहिल्यानगर या ठिकाणी सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. काव्य संमेलन, शाहिरी जलसा, एकपात्री प्रयोग, परिसंवाद, कथाकथन, गझल संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांचा साहित्य संमेलनात समावेश होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे साहित्य संमेलनात अनेक विषयावर विचार मंथन झाले. 

संमेलनाच्या समारोप सत्रात आमदार काशिनाथ दाते, स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर, संमेलनाध्यक्ष डॉ. संजीवनी तडेगावकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटवणा-या डॉ.शितल अरविंद धरम यांचा शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

   यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, शर्मिला गोसावी, राज्य संघटक डॉ.अशोक कानडे, उपाध्यक्ष डॉ. जी.पी. ढाकणे कार्यवाहक भारत गाडेकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री , प्राचार्य चंद्रकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल त्यांचे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी चे श्री साईबाबा महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. संतोष औताडे, बोधेगाव येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मच्छिंद्र फसले, कोपरगाव येथील के. जे. सोमैय्या महाविद्यालयातील माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. के. एल. गिरमकर, प्रा.डॉ. संजय दवंगे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटना, तसेच सर्व आप्तेष्ट आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here