Home विदर्भ संत रविदास जयंती उत्साहात साजरी

संत रविदास जयंती उत्साहात साजरी

213

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13फेब्रुवारी):-सामाजिक समरसता मंच चंद्रपूर व संत रविदास महाराज मंडळ यांनी माघ पौर्णिमेला संत रविदास शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समरसता मंचेचे जिल्हा संयोजक डॉ नंदकिशोर मैंदळकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलणे, यादव देवगडे, प्रशांत हजबन,सुदर्शन नैताम, मोहन जीवतोडे,वसंता भलमे, कैलास बचा शंकर, सुरेश खानझोडे, सचिन बरबटकर आदी उपस्थित होते. संत रविदासजी जातीयवाद आणि अंधविश्वास यांच्या विरोधात होते. समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी अनमोल विचार मांडले त्यांनी अनेक दोहे भजन यांची रचना करून समाजात समरसता कशी वाढेल यावर आवर्जून भर दिला.

त्यांच्या अमृतवाणी ने समाजाला योग्य दिशा दाखवून समाजाची मनोभावे निष्पार्थ सेवा केली, “मन चंगा तो कटोती मे गंगा” ” खुद को किया अर्पण, सबको दिखाया दर्पण” ” मै चाहू ऐसा राज, मिले सबको अन्न,छोटे बडे सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न” “मन ही पूजा मनही धूप, मन हू सेहु सहज स्वरूप” रवीदासजी जातीचे नव्हे तर कर्माची पुजारी होते. असे अनेक दोहे भजनांची रचना करून समाजाला प्रेरित व प्रोत्साहित करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी दिलेला विचार केलेली सेवा कार्य समाजाच्या अंतिम सदस्या पर्यंत पोहोचविण्याचे पुण्य कार्य संत शिरोमणी रविदासजींचे सेवक बनवून करायचे सर्वांनी प्रण घ्यायला हवे. असे मार्गदर्शनात संबोधले. कार्यक्रम पश्चात महाप्रसाद वितरित करण्यात आला. त्यात मुकुंदा बावणे, प्रशांत नवले, प्रभाकर खंडाळे, गजानन नवले, लपिष लिपटे, रितेश खंडाळे, संतोष बावणे, प्रणय चव्हाण, विजय खंडाळे, चंद्रशेखर खानझोडे, कमलेश दुबे, यशवंत घुले यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here