


✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.13फेब्रुवारी):- “भारतीय व्यवसाय व्यवस्थापन हे किती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे व नैतिकता आणि प्रामाणिकपणा हे या व्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. विविध संत साहित्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील काही दाखले पाहता भारतीय व्यवसाय व्यवस्थापन व्यवस्था त्याकाळी किती मजबूत होती हे लक्षात येते. यांचे महत्व आपण समजून घेतले पाहिजे. ” असे प्रतिपादन मा. डॉ. एस. के. लोखंडे यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड, वाणिज्य विभाग आणि अग्रणी महाविद्यालय बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “NEP 2020 अंतर्गत ‘भारतीय व्यवसाय व्यवस्थापन (IKS)’ अभ्यासक्रमाचे महत्व” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. (डॉ.) श्रीमती एस. आर. सरोदे (प्रभारी प्राचार्य, वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड) या उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. श्रीमती एस. सी. भस्मे ( वाणिज्य विागप्रमुख) यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. श्री. एम. एस. बागवान करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. श्री. व्ही. पी. धुमाळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एम. के. खतीब यांनी केले. या कार्यक्रमास वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड, येथील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी तसेच सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय तसेच डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय येथील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.














