Home महाराष्ट्र शेषाबाई मुंढे महाविद्यालयातर्फे नेत्र तपासणी शिबीर 

शेषाबाई मुंढे महाविद्यालयातर्फे नेत्र तपासणी शिबीर 

231

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12फेब्रुवारी):-गंगाखेड येथील कै सौ शेषाबाई सिताराम मुंढे महाविद्यालय, लायन्स क्लब गंगाखेड टाऊन आणि लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड त्यांच्या साहित्य विद्यमाने भगवान विद्यालय किनगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात किनगाव व परिसरातील एकूण 125 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. 33 नेत्र रुग्णांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड येथे पाठवण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कराड, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक मा प्राचार्य लॉ डॉ दीनानाथ फुलवाळकर, आयोजक प्राचार्य लॉ डॉ बालाजी ढाकणे, रा से यो चे प्रमुख लॉ प्रा डॉ अशोक केंद्रे आणि लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनचे सचिव लॉ प्रा डॉ राजीव आहेरकर. लॉयन नेत्र रुग्णालयाचे टीम प्रमुख डॉ पौळ, डॉ पावडे व त्यांचे सहकाऱ्यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, लॉयन्स सभासद, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ यादव सूत्रसंचालन प्रा डॉ बबन गित्ते व आभार प्रा डॉ औचित्ये यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here