


नई दिल्ली :: गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील मोठ्या संख्येने नागरिक नाट्य कला मंडळ, नाटक सारख्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारचे काम करित आहे, अश्या ह्या कलाकारांचा उदरनिर्वाह त्यांच्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातुन होतो. मात्र वयोमनानुसार आलेल्या वृद्धापकाळाने ते आपल्यातील कलेवर उदरनिर्वाह करण्यास असमर्थ ठरतात अश्या अनेक कलाकारांना उपासमारी येऊ नये म्हूणन केंद्र सरकारच्या वतीने पेन्शन देण्यात येत होती. मात्र वयोवृद्ध कलाकारांना देण्यात येणारी पेन्शन योजना बंद करण्यात आली असून ती पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत केली.













