Home महाराष्ट्र विद्युत पुरवठा करणाऱ्या ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रांसफार्मर लागली आग

विद्युत पुरवठा करणाऱ्या ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रांसफार्मर लागली आग

277

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10फेब्रुवारी):-गंगाखेड शहराला विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरला अचानक आग लागल्याने विज महावितरणच्या कार्यालय परिसरात धूर व आगीचे लोट पहायला मिळाल्याने शहरवासी हादरले होते. या वेळी आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली असून महाराष्ट्र विज महावितरणच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालय परिसरात असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ५ एमव्हीए इतक्या क्षमतेच्या ट्रांसफार्मर ला सोमवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्या मुळे गंगाखेड शहराला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर आग लागल्या मुळे धुराचे लोट व आगीचा लोळ पहायला मिळाले. आग लागल्याचे समजताच शेजारी असलेल्या लहुजी नगर परिसरात नागरिकांची एकच धावपळ उडाली व ट्रान्सफार्मरचा स्फोट होईल. या भीतीने लहुजी नगरातील रहिवाशांनी आपल्या घरातील गॅस सिलेंडर व संसार उपयोगी साहित्य वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत सर्व सामान बाजूला असलेल्या रेल्वे रुळा वर आणून ठेवले.

आग व धुराचे उठलेले लोट दूरवरून दिसत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. यामुळे कार्यालय परिसरात मोठी गर्दी जमा झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांनी घटनास्थळावर धाव घेत घटनेची पाहणी करून आग आटोक्यात आणण्यासाठी सूचना दिल्या व दुर्दैवी घटना टाळण्यासाठी येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलीसांनाही प्रयत्न करावे लागले. या आगीच्या घटनेमुळे कार्यालयासमोरील नांदेड पुणे महामार्गावर बघ्यांची गर्दी जमल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. त्याचप्रमाणे परळी रेल्वे रूळावर सुद्धा मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमल्यामुळे रस्ता आणि रेल्वे रूळ खाली करण्यासाठी पोलीसांना परिश्रम घ्यावे लागले.

आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली

नागरी वस्तीतील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपायोजनांसाठी सुचना देत गंगाखेड नगर परिषद पालम नगरपंचायत व जी ७ शुगरचे एकुण तीन अग्निशमन बंब पाचारण करून शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. वेळीच आग आटोक्यात आली नसती तर याच्या झळा कार्यालयाच्या बाजूला असलेल्या लहुजी नगर परिसरातील वस्तीला हानी झाली असती वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला असुन आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलल्या जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here