Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आधार : संघर्ष आणि त्यागाची मूर्ती – माता रमाई...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आधार : संघर्ष आणि त्यागाची मूर्ती – माता रमाई – प्राचार्य डॉ. देवेश कांबळे

212

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7फेब्रुवारी):- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने अभिवादनपर तथा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे होते. महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांची विशेष उपस्थिती लाभली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. वसुधा देवगडे विचार मंचावर उपस्थित होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात रमाई यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा “Thoughts on Pakistan” हा ग्रंथ रमाईस समर्पित केला आणि त्यांच्या संघर्षमय जीवनात रमाईने साथ दिल्यामुळेच ते सामाजिक क्रांतीची लढाई अधिक जोमाने लढू शकले असे प्रतिपादन करून आधुनिक स्त्रीजीवन आणि रमाईंच्या संघर्षाचा अनुकरणीय आदर्श या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा. वसुधा देवगडे यांनी ” माता रमाई – मातृत्वाचे महाकाव्य” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करताना रमाईच्या सहनशीलतेचा, त्यागाचा आणि बाबासाहेबांच्या कार्यास दिलेल्या पाठिंब्याचा उलगडा करत त्यांच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बी. ए. द्वितीय वर्षाच्या कु. टिकेश्वरी मैंद आणि कु. पुर्वी खोब्रागडे यांनी माता रमाई यांना आपल्या गीताच्या माध्यमातून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. लीना उके आणि आभार प्रदर्शन प्रा. माला खोब्रागडे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here