Home महाराष्ट्र समाज बांधवांकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचे सहाय्य

समाज बांधवांकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचे सहाय्य

315

✒️मूर्तिजापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुर्तीजापुर(दि.6जानेवारी):-सामाजिक न्यायासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी न्यायाची संविधानीक लढाई लढणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत हत्या करण्यात आली. समाजातील जागृत लोक एकत्र येऊन शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक, सामाजिक व वैचारिक सहकार्य करण्यासाठी समोर येत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु मुलाप्रमाणे स्वाभिमानी असलेल्या आईने शासनाची दहा लाखाची मदत नाकारून न्यायाची मागणी लावून धरली. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी समाजातील अनेक घटक समोर येत आहेत.

तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे तर एकीची ताकद दाखवून दिली. समाजातील वैचारिक लोक एकत्र आले तर सरकार पेक्षा मोठे काम करून दाखवू शकतात या माध्यमातून दिसून आले. समाजातील अनेक सामाजिक संस्था सामाजिक बांधव यांनी आपापल्या परीने होईल ती मदत करून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देऊन आपली नैतिक जबाबदारी पार पाडली. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुर्तीजापुर यांच्या माध्यमातून समाज बांधवांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये तर पॅंथर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. कोणतेही काम एकीने केले तर त्याचा प्रभाव खूप मोठा होतो हे यामधून दिसून आले आहे राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व त्यांच्यासोबत ज्या सामाजिक बांधवांनी सहकार्य केले ते सर्व कौतुकास पात्र असून नैतिक इमानदार लोक आहेत.

हे आर्थिक साह्य केल्याने आंबेडकरवादी चळवळीमध्ये ऊर्जा तर सरकारवर दबाव निर्माण होतो. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे नुकसान टाळता येऊ शकते. म्हणून कोणतेही काम एकीने करणे आवश्यक आहे ही मदत करताना आयु. सचिन गावंडे सर, आयु, सुमेद घनबहादुर, आयु पांडुरंग तारू सर, अँड गोपणारायन सर, लायसे सर आणि सुनील जाधव सर हे लोक उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here