


✒️संजय नागदेवते(विशेष प्रतिनिधी)मो:-9423415604
नेरी(दि.31जानेवारी):-चिमुर तालुक्यातील नेरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय सखाराम येलमुले हे दि ३१ जानेवारी २०२५ ला सेवानिव्रुत झाले.
१२ ऑक्टोबर २०१८ ला नेरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून रुजू झालेत, यापुर्वी ते सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे कार्यरत होते.
नेरी येथे सहा वर्षे पर्यंत पशुधन मालकांच्या जनावरांना डॉ येलमुले यांनी चांगली सेवा दिली. ते मनमिळाऊ स्वभावाचे व सर्वांचे चाहते आहेत. त्यांनी पशुवैद्यकीय क्षेत्रात ३७ वर्षाचा सेवा काळ पुर्ण केला आहे.














