Home महाराष्ट्र प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधून बाभळे गावातील कर्तुत्ववान महिलांचा व मुलींचा संविधान प्रचार...

प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधून बाभळे गावातील कर्तुत्ववान महिलांचा व मुलींचा संविधान प्रचार समिती तर्फे ग्रंथ देऊन सत्कार !

214

▪️आपले संविधान – आपला आत्मसन्मान : अँड. रविंद्र गजरे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगांव(दि.26जानेवारी):- विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व गाव गाडयाचा कार्यभार सांभाळणाऱ्या बाभळे गावातील कर्तुत्ववान महिलांचा व गावातील गुणवंत मुलींचा संविधान प्रचार समिती तर्फे सत्कार करण्यात आला.

संविधान प्रचारक अँड.रविंद्र गजरे सर आणि त्यांच्या संविधान समितीने जि.प.मराठी मूला – मूलींची शाळा बाभळे बु.येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शाळेतील शिक्षिका निशिगंधा पाटील मॅडम, अश्विनी गागुर्डे मॅडम, अंगणवाडी मुख्यसेविका सुनंदाबाई गजरे, मदतनीस मीनाबाई गजरे, मध्यान्ह भोजन मदतनीस ऊषाबाई पाटील तसेच पोलीस पाटील कविता गजरे, आशा सेविका सीमा गजरे महसूलसेवक ज्योती गजरे आणि गावातील गुणवंत विद्यार्थीनी जान्हवी पाटील (९०%) भुमिका पाटील (९२%) यांनी ई.१०वी मध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सर्व महिला व मुलींना पी डी पाटील सर लिखित “आदर्श महामाता ” हे पुस्तक भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तेजपाल ठाकूर यांचा सुध्दा संविधान समिती तर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात संविधान प्रचारक अँड रविंद्र गजरे यांनी आपल्या मनोगतातून सगळ्यांनी संविधानाचा अंगिकार करून संविधानाचा सम्मान करावा असे आवाहन केले. प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केलीत आणि चिमूकल्यांच्या भाषणांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील तरूणांनानी सहकार्य केले.तसेच विदयार्थीच्या पालकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here