


चंद्रपूर (प्रतिनिधी )-
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे होते. डॉ . किरण पटेल , राणी दुर्गावती (महिला)औ.प्र.संस्थेच्या प्राचार्य कल्पना खोब्रागडे, प्राचार्य प्रणाली डहाटे (राजुरा), रेनाल्ड सेक्युरिटीचे संचालक प्रज्योत नळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री.बोढेकर, गटनिदेशक टोंगे, गेडकर, नंदेश्वर ,बोकडे, सौ. झाडे ,सौ.निमसरकार ,श्री.तुरके आदी उपस्थित होते.
क्रिकेट क्रीडा स्पर्धेत विजेता संघ आयटीआय चंद्रपूर तर उपविजेता संघ आयटीआय पोंभुर्णा ठरला .
कबड्डी (मुलांची)च्या क्रीडा स्पर्धेत विजेता संघ आयटीआय राजुरा तर उपविजेता संघ आयटीआय चंद्रपूर ठरला.
कबड्डी (मुलींची) यात विजेता संघ आयटीआय चंद्रपूर, उपविजेता संघ आयटीआय राजुरा ठरला .
खो- खो (मुले) या क्रीडा स्पर्धेत विजेता संघ आयटीआय चंद्रपूर तर उपविजेता संघ आयटीआय सिंदेवाही ठरला. खो-खो (मुलींची) यात विजेता संघ आयटीआय वरोरा तर उपविजेता संघ आयटीआय ब्रह्मपुरी ठरला. व्हॉलीबॉल(मुले) क्रीडा स्पर्धेत विजेता संघ आयटीआय जिवती तर उपविजेता संघ आयटीआय मुल, एथॅलेटिक्स क्रीडा स्पर्धेतील १०० मीटर दौड (मुलींची) मध्ये यात विजेती कु. सावरी भगत (वरोरा) तर द्वितीय ठरली कु. किरण खोब्रागडे (चंद्रपूर) . २०० मीटर रनिंग (मुलींची) मध्ये प्रथम कु. पलक देवतळे(वरोरा) तर द्वितीय कु. आरती तुमडे (चंद्रपूर),४०० मीटर रनिंग मध्ये प्रथम कु. सावरी भगत (वरोरा) तर द्वितीय कु.आरती तुमडे(चंद्रपूर ) ,१०० मीटर रनिंग (मुले) यात प्रथम आदित्य येरावार (देवाडा) तर द्वितीय रीतीक कुळमेथे (पोंभुर्णा).
२०० मीटर रनिंग (मुले) मध्ये प्रथम रणजीत भोयर (देवाडा), द्वितीय नंदेश्वर एकरे (बल्लारपूर), ४०० मीटर दौड (मुले) मध्ये प्रथम तन्मय मांडवकर (चंद्रपूर ), द्वितीय आदित्य येरावार (देवाडा) .
लांब उडी (मुली) स्पर्धेत प्रथम सावरी भगत (वरोरा), द्वितीय गायत्री वाडगुरे (ब्रह्मपुरी) ,
उंच उडी (मुली) स्पर्धेत प्रथम गायत्री वाडगुरे (ब्रह्मपुरी), द्वितीय योगिती राऊत(बल्लारपूर) .
लांब उडी (मुले) प्रथम प्रजीत राऊत(चंद्रपूर) द्वितीय प्रीतम मेश्राम (सिंदेवाही).
उंच उडी(मुले) स्पर्धेत प्रथम गौरव आत्राम (पोंभुर्णा), द्वितीय तन्मय ठिकरे (नागभीड).
बुध्दीबळ स्पर्धेत प्रथम तेजस बिट्टूवार (राजुरा) तर द्वितीय तनिश यादव (राजुरा) .
बुध्दीबळ (मुली) स्पर्धेत कु. प्रवालिका कुरूवाला (बल्लारपूर) व द्वितीय कु. नीलिमा सुने (चंद्रपूर), कॅरम (मुली) क्रीडा स्पर्धेत प्रथम कु. विद्या निशाद तर द्वितीय कु. अंजली अंबादे (चंद्रपूर) ठरली. कॅरम (मुले) क्रीडा स्पर्धेत प्रथम रोहित डोंगरे (गोंडपिपरी) तर द्वितीय सचिन चुधरी (गोंडपिपरी) यांनी पारितोषिक पटकाविले . सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेचा आढावा रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी प्रस्तुत केला . सूत्रसंचालन एन.एन. गेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन निदेशक अभय घटे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व क्रीडा समिती व आयोजन समितीने तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयाने अथक परिश्रम घेतले.













