Home महाराष्ट्र दिव्यांगांचे तहसीलदार यांना निवेदन-प्रति महिना अनुदान वाढवावे.

दिव्यांगांचे तहसीलदार यांना निवेदन-प्रति महिना अनुदान वाढवावे.

204

 

 

अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :- गंगाखेड तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजना विभागा कडून अनुदान मिळत असताना अनुदानाची रक्कम प्रति महिन्याला जमा होत नसल्यामुळे उदरनिर्वाह चालत नाही, त्यामुळे दिव्यांग निराधारांना विशेष बाब म्हणून प्रति महिन्याला अनुदान वाटप करण्यात यावे असे निवेदन गंगाखेड तहसीलदार यांना देण्यात आले.
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत प्रति महिन्याला अनुदान मिळत नसल्यामुळे प्राधान्य निराधार प्रती महिन्याच्या पाच तारखेला अनुदान देण्यात यावे. या बरोबरच संजय गांधी दिव्यांग लाभार्थींना प्रति महिना पंधराशे ते चार हजार अनुदान देण्यात यावे असेही निवेदनावर म्हटले आहे. दिव्यांग बांधवांनी दिलेल्या निवेदनावर हरिश्चंद्र पोले, विलास भालेराव, मोहन केंद्रे, जगन्नाथ टूले, रामभाऊ निळे,सुनीता मुंडे, श्रुती कातकडे, रेखा जाधव, विठ्ठल मुसळे, रमेश केंद्रे, पांडुरंग कातकडे, राजेभाऊ चव्हाण,संजय राठोड, तुकाराम नागरगोजे,अशोक रुपनर, गोविंद भोसले, नागनाथ मुसळे, अशोक टोम्पे, देविदास कांबळे, मंगल भिसे, मोहन फड, दिगंबर भोसले इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here