


संजय नागदेवते, विशेष प्रतिनिधी मो. 94234 15604
नेरी -चिमुर तालुक्यातील भीसी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहारा येथे देशी विदेशी दारूचा महापुर सुरू असुन याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे
अनेक वर्षांपासून लोहारा येथे चार महारथी देशी विदेशी दारूची अवैध रित्या विक्री करीत आहे
त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे
या अवैध दारू च्या विक्री मुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाल्याचे दिसून येत आहे
प्रत्येक दिवशी लाखोंच्या घरात अवैध देशी दारू व विदेशी दारूची विक्री होत असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे
तसेच हे अवैध दारू विक्रेते संबंधित विभागाला हप्ते देत असल्याकारणाने खुलेआम विक्री करीत असतात अशी गावातील सुज्ञ नागरिकात चर्चा आहे
या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांची कुटुंबे उघड्यावर आल्याचे पहावयास मिळत आहे तेव्हा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित करून या अवैध दारू विक्रेत्यांवर धाडी टाकण्यात येवुन कार्यवाही करुण गावातील अवैध दारू चे अड्डे उद्ध्वस्त करावे अशी मागणी होत आहे














