Home महाराष्ट्र धरणगाव येथे खान्देश प्रवासी असोसिएशनचे पश्चिम रेल्वे डीआरएम यांना विविध मागण्यांचे निवेदन

धरणगाव येथे खान्देश प्रवासी असोसिएशनचे पश्चिम रेल्वे डीआरएम यांना विविध मागण्यांचे निवेदन

159

▪️धरणगावात गुड्स रॅक (मालधक्का) होणेबाबत डीसीएम चव्हाण यांचा सकारात्मक प्रतिसाद

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगाव(दि.17जानेवारी):-धरणगाव रेल्वे स्टेशन येथे पश्चिम रेल्वेचे डी.आर.एम. पंकज सिंग, एडीआरएम तिवारी, वरिष्ठ डीसीएम अभयसिंग चव्हाण, सीएमआय पंकज पांडे अमळनेर, संदीप गुप्ता, एडीएन संजय गुप्ता, आरपीएफ अधिकारी यांसह अन्य अधिकाऱ्यांनी अमृत योजनेअंतर्गत कार्याचा आढावा घेण्यासाठी भेट दिली होती. त्याप्रसंगी धरणगाव येथील खान्देश प्रवासी असोसिएशन तर्फे पश्चिम रेल्वेचे डी.आर.एम. पंकज सिंग यांना झेड आर.यु.सी.सी. सदस्य प्रतीक जैन यांच्या उपस्थितीत धरणगाव आणि खान्देशातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद मागण्या पुढीलप्रमाणे: १) भुसावळ ते पुणे व्हाया धरणगाव-अमळनेर-नंदुरबार-पुणे नवीन गाडी सुरू करणे. २) 19005/06 सुरत-भुसावल पॅसेंजर च्या वेळेत बदल करणे. ३) धरणगाव येथे 19045/46 ताप्तीगंगा एक्सप्रेस व 19483/84 बरोनी एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देणे. ४) 09051/52 & 09049/50 गाडी भुसावळ-दादर गाडी कायमस्वरूपी करणे. ५) धरणगाव स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत प्लान विषयी सूचना. ६) 59075/76 भुसावल-नंदुरबार गाडी सुरत पर्यंत करणे. ७) अमळनेर येथे प्रेरणा एक्सप्रेस व अन्य रेल्वे थांबा देणे. ८) 19105/06 भुसावळ-उधना गाडीला भोणे स्टेशन येथे थांबा देणे. ९) LC No RUB 137 141, 142, 145, 147 या बोगद्यांमध्ये पाणी साचणे. आणि रस्ता दुरुस्ती. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मागण्यांसंदर्भात चर्चा करताना धरणगाव येथे गुड्स रॅक (मालधक्का) सुरु करण्याबाबत डीसीएम अभयसिंग चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ॲड. नंदनराव पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड.संजय महाजन, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार सदस्य ॲड.युवराज रायपूरकर, जतिन नगरिया, नारायण महाजन, प्रशांत भाटिया, दिनेश पाटील, संभाजी सोनवणे, महाजन व झेड. आर.यु.सी.सी. सदस्य प्रतीक जैन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here