


(राकेश शर्मा जन्म दिन- वाढदिवस विशेष)
राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला, तो दि.२ एप्रिल १९८४ रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्मा यांनी अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले. अशा रोचक माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी येथे प्रस्तुत करत आहेत…
राकेश शर्मा यांचा जन्म दि.१३ जानेवारी १९४९ रोजी पटियाला, पंजाब राज्य, भारत येथे झाला. एक भारतीय लष्करी वैमानिक आणि अंतराळवीर, अंतराळातील पहिले भारतीय नागरिक आहेत. सन १९७०मध्ये शर्मा भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले. सन १९७१च्या बांगलादेश युद्धात त्यांनी मिग- २१मध्ये २१ लढाऊ मोहिमा उडवल्या. सन १९८२मध्ये त्यांची सोव्हिएत-भारतीय संयुक्त अवकाशयानासाठी अंतराळवीर म्हणून निवड झाली. दि.३ एप्रिल १९८४ रोजी त्यांनी दोन सोव्हिएत अंतराळवीर, कमांडर युरी मालीशेव्ह आणि फ्लाइट इंजिनियर गेनाडी स्ट्रेकालोव्ह यांच्यासोबत सोयुझ टी- ११वर उड्डाण केले, ते अंतराळ स्थानक सॅल्युट ७वर गेले. तेथे शर्मा यांनी अंतराळातून भारताचे छायाचित्रण आणि अभ्यासासाठी व्यायामाचा समावेश असलेले प्रयोग केले. वजनहीनतेच्या वेळी योगाचे शरीरावर होणारे परिणाम . हे मिशन जवळपास आठ दिवस चालले आणि शर्मा आणि त्यांचे क्रू सोबती ११ एप्रिल रोजी कझाकस्तानमध्ये दाखल झाले. सन १९८७मध्ये ते भारतीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये मुख्य चाचणी पायलट म्हणून रुजू झाले. सन २००१मध्ये त्यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स सोडले आणि बंगलोर- बेंगळुरू येथील प्रक्रिया-व्यवस्थापन कंपनी, ऑटोमेटेड वर्कफ्लोच्या बोर्डाचे अध्यक्ष झाले.
राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. “अंतराळातून भारत कसा दिसतो?” या प्रश्नाला त्यांनी “सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा” असे अभिमानी उत्तर दिले होते. पतियाळात जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केला गेला.
राकेश शर्मा हे भारतीय एअर फोर्समध्ये विंग कमांडर होते. वयाची २३ वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी मिग- २१ या फायटर जेटमधून २१ वेळा उड्डाण केले होते. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचा आज वाढदिवस आहे. दि.१३ जानेवारी १९४९ रोजी पटियालामध्ये त्यांचा जन्म झाला होता. दि.३ एप्रिल १९८४ रोजी अंतराळात पोहोचणारे पहिले भारतीय होण्याचा मान त्यांनाच मिळाला होता. सुमारे आठ दिवस ते अंतराळात राहिले होते. सन १९८२ साली त्यांची अंतराळ यात्रेसाठी निवड झाली. इस्रो आणि सोव्हिएत संघ यांच्या संयुक्त मोहिमेंतर्गत सोयूज टी-११ या यानातून ते अंतराळात गेले होते.
सारे जहाँ से अच्छा.., सोयूज टी-११ मधील क्रूसोबत एका जॉइंट कॉन्फरन्समध्ये भारताने पहिल्यांदाच अंतराळातील आपल्या नागरिकासोबत गप्पा मारल्या होत्या. यावेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारलं होतं, की अंतराळातून भारत कसा दिसतोय? यावेळी उत्तर देताना राकेश शर्मा हिंदीतून म्हणाले होते, “सारे जहाँ से अच्छा..!”
पुढचं वर्षही गाजवणार ‘इस्रो’; पहिल्या दिवसापासूनच होणार मोहिमांची सुरुवात! राकेश शर्मांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, की सोयूज यानाच्या प्रक्षेपणाच्या दिवशी त्यांना अगदीच ‘बोरिंग’ वाटत होतं. या क्षणाचा सराव त्यांनी बऱ्याच वेळा केला होता. त्यामुळे त्या दिवशीही अगदी रुटीन असल्याप्रमाणेच सगळं पार पडलं, असं ते सांगतात. ते सध्या काय करतात? या आपल्या प्रश्नाचे उत्तर – राकेश शर्मा हे सध्या कुन्नूर नावाच्या एका छोट्या गावात आपल्या पत्नीसोबत राहतात. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर अगदी साधं आयुष्य ते जगत आहेत. अर्थात, ते अंतराळ मोहिमांपासून नक्कीच दूर झाले नाहीत. ते सध्या इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी सल्लागार म्हणून मदत करत आहेत. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच स्वतः स्पेसमध्ये अंतराळवीर पाठवणार आहे, हे विशेष!
|| अंतराळवीर मा.राकेशजी शर्मा यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी ||
✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.रामनगर वॉर्ड, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३














