Home महाराष्ट्र उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठित

उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठित

225

▪️तालुका अध्यक्षपदी शामभाऊ धुळे तर सचिवपदी प्रसेनजीत दिवेकर यांची निवड

✒️उमरखेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

उमरखेड(दि.8जानेवारी):- शहरामधील रेस्ट हाऊस येथे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी “उमरखेड प्रेस क्लब” नवीन पत्रकार संघ तयार करण्यात आला.

आज बाळशास्त्री जांभेकर जयंती दिनी बैठकीचे आयोजन केले होते. म्हणून आज उमरखेड तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी सर्वांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.

या कार्यकारणी चे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून शामभाऊ धुळे (संपादक जनहीत 24 न्यूज), उपाध्यक्षपदी सिद्धार्थ दिवेकर. (सहसंपादक महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल) तर सचिव पदी प्रसेनजीत दिवेकर (वंदे भारत न्यूज तालुका प्रतिनिधी), कोषाध्यक्षपदी बबलु भालेराव (संपादक महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल), कार्याध्यक्षपदी शूद्धोधन दिवेकर (योद्धा बातमीचा तालुका प्रतिनिधी), निशांत मनवर (दैनिक अधिकारनामा), संघटकपदी अत्तदिपधुळे (जनहीत मराठी), प्रविण इंगळे (दै सुपर भारत तालुका प्रतिनिधी) तर सदस्य म्हणून प्रफुल दिवेकर (न्यूज24महाराष्ट्र मराठी तालुका प्रतिनिधी) इत्यादी निवड करण्यात आली.

वरील सर्वांची उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघ च्या निवड झाल्याबद्दल तालुक्यातून या नवीन पत्रकार संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या बैठकीचे सुत्रसंचलन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार सुभाष वाघाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here