Home महाराष्ट्र आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मेंढा ख. येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन...

आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मेंढा ख. येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

259

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.6जानेवारी):-तालुक्यातील नामांकित मेंढा( खडकी)येथील आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मेंढा (ख) येथील स्नेहसंमेलनाचा उद्घाटन दिमाखात साजरा झाला.

नृत्य अविष्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध नृत्य अविष्कार गीत गायन नाटिका पथनाट्य एकांकिका नृत्य असे रंगदार नृत्य अविष्काराने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला स्नेहसंमेलनाचे उद्घाटन – मा. श्री कीर्तीकुमार बंटीभाऊ भांगडिया साहेब आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाचे झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक. मा. डॉ. श्री. रामकृष्णजी मडावी साहेब. माजी आमदार तथा संस्थापक आ. ग्रां. जी. वि. शिक्षण संस्था करपडा प्रमुख मार्गदर्शक- मा. डॉ. श्री. अमीर धमानी सर सेवानिवृत्त, प्राचार्य. मा. प्रा. डॉ. श्री. धनराज खानोरकर सर, व्यासपीठावर श्री.सरपंच आनंदजी कोरे .ग्रामपंचायत मेंढा, मा. श्री. विजयजी झोळे प्राचार्य आकाश विद्यालय मोझरी, सुस्वागतम या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. आर वाय कोरे सर यांनी केले. त्यांनी वर्षभरातील विविध उपक्रमाबद्दल माहिती देऊन अहवाल सादर केला व्यासपीठावर पाहुण्यांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडपायले सर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. गोहने मॅडम, प्रा. डॉ. सौ.जगनाडे मॅडम. प्रा. भांडारकर मॅडम, कुंभलवार मॅडम, मडावी मॅडम , यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.पारधी सर, गडपायले सर,परशुरामकर सर, कोहाडे सर, मडावी सर, एम मेश्राम सर, बागडे , नैताम, तलमले,यांनी काम पहिले विद्यार्थ्यांना शिस्तीचे काम सर्व शिक्षकांनी पहिले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी विद्यार्थी आणी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . उद्घाटन समारंभ संपन्न झाला शेवटी आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सौ.जगनाडे मॅडम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here