



दौंड- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानगाव ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात ओळखली जाते. याच शाळेने विद्यार्थ्यांना खरेदी विक्री तसेच व्यवहार ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला यासाठी शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी आनंदी बाजार आणि खाऊ गल्ली या उपक्रमाचे आयोजन केले होते. आनंदी बाजार या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार भरवला होता. या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळभाज्या, फळे, गुळाची ढेप, बिस्किटे, घरगुती शोभिवंत वस्तू तसेच विविध प्रकारच्या स्टेशनरीचे स्टॉल लावले होते. तसेच खाऊ गल्ली मध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या आनंदी बाजाराला पालकांचा तसेच ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. या आनंदी बाजाराला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी केली तसेच खाऊ गल्लीला भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खाद्य पदार्थांवर ताव मारला. या आनंदी बाजारात जवळपास तीस हजार रुपयांची उलाढाल झाली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आनंदी बाजाराचे उदघाटन दौंड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील घुमरे साहेब यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कोरहाळे, उपाध्यक्ष योगेश चौधरी, नानासाहेब कोऱ्हाळे, ज्ञानेश्वर हरगुडे, शंकर काळे, नाना चौधरी, ऍड. पोपटराव गवळी, मनोहर गवळी, निलेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा आनंदी बाजाराचे आयोजन मुख्याध्यापक शामराव जगताप, राजेंद्र जगताप, श्याम ठाणेदार, एकनाथ हराळ, सखाराम खोमणे, प्रकाश लकडे, सौ संध्या कुंभार, शोभा कोष्टी या शिक्षकांनी केले होते.













