


भारतीय समाज रचनेचा इतिहास पाहता संपूर्ण भारतामध्ये विषमतावादी संस्कृती अस्तित्वात होती. उच्च आणि निच्य प्रवृत्ती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अस्तित्वात असताना ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे वर्गीकरण मोठ्या प्रमाणात दिसून येत असत या विषमतावादी संस्कृती मध्ये महिलांना घरातील चूल आणि मूल मध्येच बंधन घालून नाईलाजाने राहावे लागत असत. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्याचा अधिकार मागणे असे कदापिही दिसून येत नसल्यामुळे विषमतावादी संस्कृती सांगेल त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या वर्णा प्रमाणे जीवन जगण्याची बंधने घालून दिली जायची. जातीय प्रथेमध्ये गुलामगिरीची प्रथा वाढत असतानाच त्या मध्येच आधुनिक विचाराचा वारसा घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक विचाराची स्थापना करत संपूर्ण भारतमय सत्यशोधक चळवळ सुरू करून आधुनिक विचार मांडत विषमतावादी संस्कृतीला छेद दिला.सत्यशोधक चळवळ सुरू करत असताना महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनाही सत्यशोधक विचाराचे धडे दिले त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेचा सत्यशोधक विचार रुजवण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व जाणून स्वतः महात्मा फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन बहुजन समाजाला शिक्षण देण्याचा ध्यास लक्षात घेऊन महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचाराला धार दिली.
विषमतावादी संस्कृती मध्ये विशिष्ट जातींना शिक्षणाचा अधिकार होता. बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवल्या मुळे अन्यायाचे प्रमाण जास्त होते.अशिक्षित बहुजन समाज असल्यामुळे जातीय प्रथिने घालून दिलेले दुष्ट विचार आचरणातून प्रत्येकाला करणे भाग पडायचे.त्यामुळे महात्मा फुले यांनी गुलामगिरीचे मूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व बहुजन समाजाला शिक्षणाची द्वारे उघडून ” विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीती विना गती विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले ” ही म्हण लक्षात घेऊन संपूर्ण भारतातील गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने जाती प्रथा बंद करत प्रत्येक जण सत्यशोधक वेगळा विचार करू लागला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती असल्यामुळे सर्व बहुजन समाजाने महात्मा फुलेंची ओळख लक्षात घेता सावित्रीमाई फुले यांनाही प्रत्येकाने 03 जानेवारी जयंती निमित्त अभिवादन केले पाहिजे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक विचाराची चळवळ चालवत असताना त्यांनी आपल्या विचारात सांगत असताना फुले म्हणतात, प्रत्येक जण,जन्म, धर्म,जात,वंश,लिंग यावरून भेदभाव करणे अत्यंत चुकीचे असून प्रत्येकाला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे.जातीय प्रथा,रूढी, परंपरा आधुनिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून नष्ट झाल्या पाहिजे.या साठीच महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तना साठी अर्पण केले.
असतानाच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून शिक्षण घेऊन महात्मा फुले यांचा विचाराचा वारसा चालवत सत्यशोधक विचार भारतीय संविधानाच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये प्राधान्याने समाविष्ट केला.भारतीय विषमतावादी संस्कृती मधील महिला विषयक परंपरा भविष्यात बंद करण्याच्या उद्देशाने 20 जुलै 1942 नागपूर या ठिकाणी दलित स्त्रियांची पहिली परिषद घेत महिलांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठी परिषद घेऊन आपले विचार व्यक्त केले.जातीय प्रथे मध्ये अडकलेल्या विषमतावादी संस्कृतीच्या दलित महिला त्यावेळी वीस ते पंचवीस हजार परिषदेस उपस्थित होत्या. पुढे 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र भारतात जेव्हा कायदामंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली त्यावेळेस मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी संस्कृतीला हादरा देत समता,स्वातंत्र्य,बंधुत्व व न्याय पुरस्कार करणारी विचारसरणी नवीन विचार भारतीय संविधानातून व्यक्त केला. भारतीय संविधानातील चार मूलतत्त्वावर आधारित स्वातंत्र्य,समता,बंधुत्व व न्याय प्रामुख्याने संविधानात समाविष्ट करून महिला व बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला. धर्म,जात,वैश्य,लिंग व जन्मस्थान यावरून असलेली विषमतावादी संस्कृती छेद देऊन कलम 14 व्या मध्ये समानता अस्तित्वात आणली. 15-2 नुसार सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळणे असा कायदा करत 15-3 नुसार स्त्रिया व बालके यांच्या करिता विशेष तरतूद करत 15-1,2 तयार करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सेवायोजन,पदं नियुक्ती आणि नोकरी इत्यादी मध्ये धर्म,जात,वैंश,लिंग,कुळ भेदभाव केला जाणार नाही असे स्पष्ट करत प्रत्येक भारतीयांना न्याय देण्याची काम केले आहे हे विसरता येणार नाही.
✒️शब्दांकन:-राहुल साबणे(पत्रकार)गंगाखेड जि. परभणी
▪️संकलन:-अनिल साळवे(परभणी जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515














