Home महाराष्ट्र सावित्रीबाई फुले विद्यालयचा तालुका विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रथम क्रमांक

सावित्रीबाई फुले विद्यालयचा तालुका विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रथम क्रमांक

197

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि28डिसेंबर):- शिक्षणाची काशी म्हणवल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी येथे आयोजित शैक्षणिक सत्र 2024-25 मधील तालुका विज्ञान प्रदर्शनीचा निकाल दिनांक 28/12/2024 ला घोषित करण्यात आला.

या मध्ये आमच्या सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रम्हपुरी त. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील वर्ग 6 ते 8 गटातून अनुज राकेश नागदेवते आणि कू युक्ती प्रकाश बनकर यांच्या मॉडेल चे परीक्षण केल्या अंती प्रथम घोषित करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थ्याना कू श्रेया मारोती कार यांचे मार्गदर्शन लाभले. उत्कृष्ठ रित्या सर्व टीम ने कर्तुत्व बजावले आणि प्रथम पारितोषिकाचे मानांकन मिळविले. निकाल घोषित होताच संस्थेचे आद.अध्यक्ष तसेच अन्य मान्यवर पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here