


✒️छ. संभाजीनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
छत्रपती संभाजीनगर(दि.5डिसेंबर):-हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या पदाधिऱ्यांची ऑनलाईन बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या अक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश व सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी यांनी प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या सहमतीने हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष पदी अकील काजी यांची नियुक्ती केली.
राज्यात कुठेही पत्रकारांवर अन्याय झाल्यास हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकारांच्या समस्यांवर आवाज उठवणार असल्याचे प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी यांनी सांगितले.
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष पदी अकील काजी यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र अध्यक्ष असलम कुरेशी, प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी, प्रदेश महासचिव विनोद भोकरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव जावेद पठाण (भोकरदन), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंह ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रियाज शेख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक संजय तुपे, सय्यद महेबुब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजी अडियाल, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव शेख शकिल (जळगांव), मराठवाडा प्रवक्ता रहिम पठाण, विदर्भ प्रवक्ता सय्यद जावेद, महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रभारी अमजद पठाण, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राम कोडवते, उमेश गोधने, महेश भैराम, धनंजय तरारे, विदर्भ विभागीय अध्यक्ष मो. तारेक शेख, नागपूर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मुरकुटे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मिर्झा अक्रम बेग, अमरावती जिल्हा अध्यक्ष मुबिन शेख, गोंदीया जिल्हा अध्यक्ष गौरव कुमार, वर्धा जिल्हा अध्यक्ष तनविर अशरफ, नांदेड जिल्हा अध्यक्ष सुनिल शेळके, अविनाश मेश्राम, आरती प्रजापती, इलियास बेग, गोपाल इंगोले आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.














