Home महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे कौशल्य दीक्षांत समारंभ संपन्न

औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे कौशल्य दीक्षांत समारंभ संपन्न

115

 

उमरखेड प्रतिनिधी- अत्तदिप धुळे

औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे दिनांक २८/१०/२०२४ रोजी संस्थेतील विविध व्यवसायामधून अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कौशल्य दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुरेश पी. गोरे अध्यक्ष औदुंबर ज्येष्ठ नागरिक मंडळ ऊमरखेड व श्री जी.पी.काळे , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य श्री. डी.पी.पवार साहेब तसेच गटनिदेशक श्री.एस. डब्ल्यू. खुटाफळे, पालक प्रतिनिधी श्री दिलीप धुळे, पराते मॅडम व इतर पालक प्रतिनिधी मंचावर उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमा पूजनाने व प्रमुख अतिथींच्या स्वागताने करण्यात आली कौशल्य दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे गटनिदेशक श्री.एस.डब्ल्यू. खुटाफळे यांनी केले व दिक्षांत समारंभाच्या आयोजनाचा उद्देश विशद केला, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर एस.के.गोरे यांनी कौशल्य दीक्षांत समारंभासाठी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच समाजामध्ये, परिसरामध्ये असलेल्या विविध नागरी समस्या नागरिक, शासन व प्रशासन यांच्या समन्वयांमधून सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत, तसेच जागतिक प्रदूषण, वृक्ष संवर्धन, आरोग्य विषयक समस्या यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी देशाचे जागरूक नागरिक या भूमिकेतून काम करावे असे आवाहन केले .संस्थेचे प्राचार्य श्री. डी.पी.पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेमध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआय प्रमाणपत्राच्या आधारे केंद्र व राज्य सरकारच्या विविध खात्यामध्ये असलेल्या विविध रोजगारांच्या , स्वयंरोजगाराच्या , उच्च शिक्षणाच्या व स्वयंरोजगारासाठी व उद्योग व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध आर्थिक मदतीच्या योजनांची माहिती देऊन सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून मिळवलेल्या यशाचे व प्राप्त संधीचे सोने करून स्वतःचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी , आई-वडिलांचा समाजाचा,
संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिशियन वायरमन ,फिटर, मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक, वेल्डर ,पत्रेकारागीर, ड्रेसमेकिंग, कॉस्मेटोलॉजी या व्यवसायातुन अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा २०२४ मध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या एकूण २७ प्रशिक्षणार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र, गुणपत्र व बोर्ड प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान व गौरव करण्यात आला सोबतच त्यांच्या पालकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संचालन श्री.ए.डी.कुंभारे शिल्प निदेशक मोटर मेकॅनिक व आभार प्रदर्शन श्री.ए.जी. देशमुख यांनी केले सदर कार्यक्रमासाठी आयटीआय उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थी , पालक वर्ग तसेच नियमित प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व शिक्षक वृंद सर्वश्री परोपटे,पाटील ,साबळे, निंबोळकर , शिंदे,नरवाडे,कदम ,चिंचाळे, भोसले , सोनुळे कुंभारे, नरवाडे मॅडम , निंबेकर मॅडम, कवाने मॅडम, व कार्यालयीन कर्मचारी सर्वश्री इंगोले,थोंबाळे , गवई व कांबळे, धुळे ,पोपुलवाड यांनी परिश्रम घेऊन कौशल्य दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here