Home महाराष्ट्र उमरखेड एसटी आगार मध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा

उमरखेड एसटी आगार मध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा

283

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (२८ सप्टेंबर) शहरातील एसटी आगारात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला.
तसेच यवतमाळ विभागात नफ्यात उमरखेड एसटी आगार हे प्रथम क्रमांकावर आल्यामुळे आगार व्यवस्थापक व कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

प्रस्तुत कार्यक्रम हा श्रीमती किनाके मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विशाल गीरी सर हे होते तर विशेष उपस्थिती शहीद भगतसिंग न प शाळा क्रं २ चे मुख्याध्यापक अशिष राठोड सर व पत्रकार सिध्दार्थ दिवेकर होते.

वरिल मान्यवरांनी या प्रसंगी श्रीमती किनाके मॅडम व कर्मचारी वर्गांचा सत्कार करण्यात आला.

प्रस्तावना चनेबोईनवाड यांनी मांडली तसेच मार्गदर्शन करताना विशाल गिरी सरांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ बदल माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात श्रीमती किनाके मॅडम यांनी माहीती अधिकार बाबत व आगारा ची स्थिती सद्या चांगली असून या पुढे आगार नफ्यातच राहील या करिता आपण सर्वांनी प्रयत्नशील व कटिबध्द असणे आवश्यक आहे असे सांगितले.

या कार्यकमासाठी भदाडे साहेब स का अ, मनवर साहेब, स वा अ जाधव साहेब, वाह निरी, तसेच पोफाळकर, मनिष दुबे, शफाऊला खाँन, पवार,अ जाधव श्री चेके, चिरंगे, राचयटकर, सौंदनकर, वानखेडे, माळवे, तायडे उपस्थित होते.

सुत्रसंचालन श्री चनेबोईनवाड यांनी केल आहे तर आभार श्री उगले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here