


अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड : बदलापूर येथील दोन विद्यार्थीनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. या बंद मध्ये गंगाखेड मधील व्यापारी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गंगाखेड महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
या संदर्भात आज गंगाखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) तालुकाध्यक्ष ऊद्धवराव सातपुते, शिवसेना ( ऊद्धव ठाकरे ) जिल्हा उपप्रमुख ॲड. मनोज काकाणी, शहर प्रमुख जीतेश गोरे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष नारायण घनवटे, माजी नगरसेवक मुस्तफा मामा आदि उपस्थित होते. ऊद्या(24 ऑगस्ट ) सकाळी १० वाजता शहरातील भगवती चौक येथून मुक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. आपले व्यवहार बंद ठेवून व्यापारी बांधवांनी या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














