Home महाराष्ट्र डॉ शंकरराव खरात साहित्य संमेलन आटपाडी येथे संपन्न

डॉ शंकरराव खरात साहित्य संमेलन आटपाडी येथे संपन्न

284

 

आटपाडी – येथील श्री चौडेश्वरी मंदिर सांस्कृतिक भवनामध्ये ज्येष्ठ थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या 103 जयंती निमित्त तिसरे डॉ शंकरराव खरात साहित्य संमेलन आटपाडी माणदेशी आयोजित करण्यात आले होते.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली पालखी मध्ये डॉ शंकरराव खरात यांची ग्रंथसंपदा ठेवण्यात आली होती ग्रंथदिंडीत डॉ शंकरराव खरात यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला ग्रामस्थ कवी लेखक पत्रकार निवेदक समिक्षक पोलिस अधिकारी शासकीय अधिकारी श्री भवानी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक पालक व वत्सलादेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी आटपाडी नगरातून काढून संमेलन स्थळी विराजमान केली.
संमेलनाचे उद्घाटक मा. श्री.पद्मभूषण राम नाईक माजी राज्यपाल उ.प्रदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र अण्णा देशमुख माजी आमदार व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व डॉ शंकरराव खरात यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना पद्मभूषण राम नाईक म्हणाले आपण भारताचे नागरिक आहेत सर्वांगीण कार्य केले पाहिजे समाजाचे कल्याण करण्याचा संकल्प करणे ही काळाची गरज आहे तसेच डॉ शंकरराव खरात यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
राज्यपाल राम नाईक यांच्या शुभहस्ते डॉ विजय गोटे लिखित यशस्वी होण्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्या प्रसंगी बोलताना माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले संयुक्तपणे कार्यक्रम घेण्यात आला आहे लेखनाची वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे डॉ शंकरराव खरात यांनी अडचणीतून शिक्षण घेतले ते सिंहावलोकन करणे गरजेचे आहे त्याप्रसंगी विचारपीठावर डॉ रविंद्र शंकरराव खरात शिवाजी पाटील माजी सरपंच आप्पासाहेब काळेबाग विलास खरात हे प्रामुख्याने उपस्थित होते
परिसंवाद या सत्रात डॉ शंकरराव खरात यांच्या साहित्याचा सांस्कृतिक आणि वाड्मय दृष्टिकोन या विषयाच्या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ कृष्णा इंगोले अध्यक्षीय भाषणात म्हणाले वक्त्यांनी व्यक्त होताना विषयानुसार बोलले पाहिजे विषयांतर करून परिसंवाद होत नसतो त्यांचे भान त्या व्यक्त्याला पाहिजे असे व्यक्त झाले व वक्ते ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ सयाजीराजे मोकाशी म्हणाले सामाजिक समतेवर वाड्मय दृष्टिकोनाची भुमिका मांडणारे प्रतिकूल परिस्थितीचा कस साहित्यात जपणारे माणदेशाच्या मातीशी नाळ जोडणारे साहित्यिक जाणकार डॉ शंकरराव खरात होय.ज्येष्ठ साहित्यिक बा.ना.धांडोरे म्हणतात प्रेरणेतून विद्रोह निर्माण होता सत्य असता कळू लागते अन् लोक वाचू लागतात प्रा सुनिल दबडे म्हणाले डॉ शंकरराव खरात यांच्या वडिलांना मुलांचे पत्र वाचण्यासाठी लाकडे फोडून द्यावी लागली मुलगा कुलगुरू झाला ही देशाच्या इतिहासातील मोठी घटना आहे
पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळा दुसऱ्या सत्रात परिसंवाद झाला असून यांचे सूत्रसंचालन प्रा विजय शिंदे यांनी केले.
तिसऱ्या सत्रातील कविसंमेलनाचे अध्यक्ष
गझलकार सुधाकर इनामदार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणतात
इतकेच मूल्य मुंग्यांच्या घामाचे आहे
वारूळ बांधल्यावर सापाचे झाले आहे
असे ते व्यक्त झाले निमंत्रित कवी शिवाजी बंडगर निवेदक रानकवी जगदीप वनशिव अंकुश मुढे माणदेशी डॉ लक्ष्मण हेंबाडे मेघा पाटील रक्षा पाटील पुप्षा मिसाळ मनिषा जाधव प्रा .रमेश जावीर ज्ञानेश डोंगरे अस्मिता माळी चंद्रवर्धन लांडगे रघुराज मेटकरी शाहीर हरिभाऊ गळवे
या कवींनी अण्णाभाऊ साठे शेती भाजी श्वास संत चोखामेळा बाप वंशवेल अनमोल ठेवा पंढरी शिवबा राजा रं अफजलखान वध पोवाडा निग्रस्थ ज्वालामुखी झाड होवून पहावं पोवाडा अभंग मुक्तछंद अशा विविध विषयांवर कविता सादरीकरण करून कवी कवयत्रीनी रसिकांनी मनमुरादपणे टाळ्या वाजवून स्वागत केले अशा मंत्र मुग्ध कविसंमेलनाचे बहारदार दमदार आवाजात सूत्रसंचालन प्रा.श्रीकृष्ण पडळकर यांनी केले आटपाडी गावचे सुपुत्र राज्यपाल पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी राम नाईक यांचा ग्रामस्थाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला अशा प्रकारे एक दिवसीय साहित्य संमेलनाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here