


✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी
घरात पाहुणा येणार असल्याने नवचैतन्य निर्माण झाले होते. प्रत्येक दिवस आनंदात जात होता. या आनंदात आठ महिने लोटल्यानंतर घरात धार्मिक विधीचा निर्णय झाला अन् दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाला जीवदान देऊन ती आई झाली, मात्र मुलाचा चेहरा न पाहताच जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नागभीड तालुक्यातील मागरुड येथील रमेश उईके यांची मुलगी सौ. सपना सतिश धुर्वे रा. नागपूर लग्न झाल्यापासून आपल्या पती,पत्नी व एक तीन वर्षाची मुलगी असा परिवार घेऊन राहत होती त्यानंतर त्यानंतर आता ती गरोधर राहली नव महिने पूर्ण झाले तिला डिलेव्हरी साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सपना ही स्वतः आजारी पडली तिचा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा नसल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळाला जीवदान दिले. ती आई झाली, मात्र मुलाचा चेहरा न पाहताच जगाचा निरोप घेतला.याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश भाऊ वारजुकर यांना मिळताच मांगरुड येथे जाऊन परिवाराची भेट घेतली व आर्थिक मदत केली या वेळी सरपंच येनोली अमोल बावणकर, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे, नेताजी निकुरे, मोरेश्वर गुरपूढे, पितांबर अलोणे, जीवन शेंडे, नितेश मेश्राम, उपस्थित होते














