Home मुंबई विहार सरोवर शेजारी प्रशांत शर्मा यांच्या साईट चे काम पुन्हा चालू? ...

विहार सरोवर शेजारी प्रशांत शर्मा यांच्या साईट चे काम पुन्हा चालू? मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांची जागेला भेट, लोकप्रतिनिधी मार्फत देवाण घेवाण झाल्याची चर्चा

298

 

मुंबई दि (प्रतिनिधी) देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियान चे राष्ट्रीय आयोजक विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी विहार सरोवर शेजारी होत असलेले काम बंद केले होते मात्र अचानक शनिवारी अधिकाऱ्यांनी साईट विजिट केली आणि आज रविवार रोजी पुन्हा काम चालू केल्याचे दिसून येत आहे.

यामुळे डॉ. माकणीकर यांनी संशय व्यक्त केला असून विहार सरोवर शेजारी काम होवू देणार नसल्याचे भिमप्रतिज्ञा केली आहे. असे असताना प्रशांत शर्मा यांचे काम बंद करण्यात आले होते. मात्र शनिवारी मनपा व पोलीस अधिकारी यांनी भेट दिली आणि पुन्हा काम चालू झाले यामुळे डॉ. माकणीकर यांनी असंतोष व्यक्त केला आहे.

कोणत्या कारणाने सदरचे काम चालू झाले असून कोणती देवाण घेवाण येथे करण्यात आली आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणती बाजू मांडून प्रशांत शर्मा यांचे काम चालू केले आहे. हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वाच म्हणजे कोणी कितीही मोठा अधिकारी किंवा कितीही मोठे राजकीय वलय निर्माण होवून विहार सरोवर शेजारी प्रशांत शर्मा यांचे काम चालू झाले आहे. ते रोखून आपण निसर्गाचा समतोल राखू असे मत डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

विहार सरोवर ही निसर्गाची संपत्ती असून, सरोवराच्या बाजूला बांधकाम करून भु-जल व भु-गर्भ पातळी धोक्यात येवून निसर्गाचा समतोल ढासळू देणार नाही. यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर… अजून कुण्या अंडर वर्ल्ड ला माझी सुपारी द्यायची ते देवू शकता असे आवाहन डॉ. माकणीकर यांनी विकासक प्रशांत शर्मा यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here