


बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद-वडील लहानपणीच सोडून गेले,दोन्ही पायांने जन्मताच दिव्यांग मुकिंदा दत्ता वानखेडे राहणार पिंपळगाव पुसद. मुकिंदाला वडील नसल्यामुळे आई उज्वला वानखेडे या मागील २६ वर्षापासून अपंगत्व असलेल्या मुकिंदाला घेऊन पिंपळगाव येथे अतिक्रमण असलेल्या जागेत राहुन त्याची आई मोलमजुरी करून आपले व आपल्या मुलाचे पालनपोषण करत होती पण आता वयोमानानुसार त्याच्या आईला काम होत नसल्यामुळे घर चालवणे कठीण झाले,आपणही काही करून आपल्या आईला काही आर्थिक मदत होईल असा विचार मनात आला पण शब्दाने सांत्वना करणारे खूप असतात परंतु प्रत्यक्ष मदत करणारी माणूसकीची भिंत गरजवंतांना मदत करते हे मुकुंदाला माहित झाले. माणुसकीच्या भिंतीकडे त्याच्या तीन चाकी सायकलवर छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी मदत मागितली, माणुसकीची भिंत सदस्यांनी त्याच्या घरी जाऊन भेट दिली व माणुसकीच्या भिंतीच्या व्हाट्सअप ग्रुपवर मुकिंदाला छोटासा उद्योग सुरू करून देण्यासाठी शुभचिंतकांना आवाहन केले, जेणेकरून त्याच्या हाताला काम भेटेल, माणुसकीची भिंतच्या मदतीच्या आव्हानाला सर्व शुभचिंतकांनी भरभरून साथ दिली,माणुसकीची भिंत सदस्यांनी २०००० एवढी रक्कम मुकींदाला जमा करून देण्याचे ठरविले या रक्कमेच्या मदतीने त्याला गोळ्या बिस्किट स्टेशनरी असे उपयुक्त सामान विक्रीकरिता घेऊन देण्याचे ठरविले व माणुसकीची भिंत दात्यांनी दोन दिवसातच २६९०६ रुपयाची भरभरून मदत केली, या पैशांमध्ये माणुसकीची भिंत्याच्या सदस्यांनी मुकुंदला त्याच्या तीन चाकी सायकलवर दुकानचे सेटअप उभारून त्यामध्ये स्टेशनरी डेलीनीडचे सामान ८६१५ रुपयाचे घेऊन दिले व उर्वरितरक्कम१८२९१ चेकद्वारे त्यांच्या स्वाधीन केली, यावेळेस माणुसकीची भिंत चे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्व दातांचे आभार मानले व जमा झालेल्या पैशांचा हिशोब सर्व दात्यांना देण्यात आला या उपक्रमास मदत करणाऱ्या दात्यांची नावे माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्या, शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, ज्ञानेश्वर राऊत,नंददीप फाऊंडेशन यवतमाळ, स्वाती दळवी वाट, सुरज शिंदे, श्याम जिरोणकर, अरविंद पवार, किरण देशमुख, डॉ. अतुल सुरेश रुणवाल, एकनाथराव घोडेकर, गिरीश जयस्वाल,नंदकिशोर सातारकर, डॉ.शशिकांत बेलोरकर, डॉ.अनुष्का संतोष तडकसे, सुदर्शन शिंदे, सुभाष आनंदराव कदम,उमेश गजानन गावंडे, मधुकर चिंतावार,राज राजेश्वर मेडिकल, मंजुषा डेकाटे मॅडम, निशांत लक्ष्मणराव देऊळकर, सागर आदिनाथ भागवत, राधा राणी ग्रुप,
गजानन सुखदेवराव ठाकरे, सुशील झांबानी, मंगेश भगतसर, अंकुश अरुणराव घुरडे, संदीप भाऊरावजी मानकर, दिनकर दमकोंडावार, अविनाश मुखरे, हरगोविंद कदम, उमेश रमेश देवतळे, सुनील कोमरपल्लीवार, प्रा प्रकाश लामणे सर, राहुल राजेश्वर, रेवनवार, राम डंगाले, अर्चना गोपाल यादव,चंदन जाधव पोलीस जमदार ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद व सिद्धार्थ कदम, राम गुलवे,अनिल पवार, माणुसकीच्या भिंतीचे सर्व सदस्य व पुसद मधील माणुसकीची भिंत शुभचिंतक उपस्थित होते













