Home यवतमाळ अमरावतीकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – खा. बळवंत वानखडे

अमरावतीकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – खा. बळवंत वानखडे

252

 

शेखर बडगे /अमरावती
अमरावती जिल्ह्यातील सर्व समाजाच्या जनतेने आपल्याला भरभरून मदत केली, आहे साथ दिली आहे. जनतेच्या आणि मतदारांच्या या आशीर्वादावरच आपण निवडून आलो आहोत. त्यामुळेच एका बलाढ्य शक्तीला पराभूत करता आले. अमरावती मधील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे प्रेम अमरावतीकरांनी दाखवलं त्यांच्या प्रेमाला आणि स्वाभिमानाला ठेच लागू देणार नाही अशी ग्वाही खासदार बळवंत वानखडे यांनी दिली. अमरावती येथे काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी बोलताना वानखडे पुढे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील खासदाराला दिल्लीमध्ये खूप महत्त्व प्राप्त झाले. स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांना हरवणारे खासदार कोण याचा दिल्लीमध्ये मोठा बोलवाला झाला. हे सर्व आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेने केलेल्या मेहनतीचे फळ आहे. झब्बा पायजमा मधला एक नेता दिल्लीमध्ये खूप थाटात वावरला तो तुमच्या सर्वांमुळेच त्यामुळे अमरावती येथील जनतेची सर्व कामे यापुढे करण्याची जबाबदारी आपली असून त्यासाठी आपण येथे कार्यालय स्थापन करीत आहोत आणि जनतेच्या सेवेत सतत राहणार अशी ग्वाही वानखडे यांनी यावेळी दिली.

अनेक अडचणींवर मात करत विजय– ॲड.ठाकूर

यावेळी बोलताना माजी मंत्री आणि काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेचा इतिहासच मांडला. गेल्या निवडणुकीत आपणच सर्वांनी मिळून राणा यांना निवडून दिले होते मात्र त्यांनी आठ दिवसातच आपले रंग दाखवले. दिवसा मतदार संघात त्यांनी एक कार्यक्रम घेतला आणि त्यात त्यांनी विधानसभेला काय होते बघूया असे आव्हान दिले होते. मात्र अमरावती आणि तिवसा मतदार संघातील जनतेने नेहमीप्रमाणे आपल्या मागे शक्ती उभी केली आणि विश्वास दाखवला आणि आपण निवडून आलो. त्याच वेळेस आपण ठरवले होते की पुढील खासदार हा आपला काँग्रेस पक्षाचा होईल. तेव्हापासूनच बळवंत भाऊ वानखडे हेच खासदार होतील यासाठी आपण प्रयत्न सुरू केले. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही याबाबत आपण विनंती केली आणि ही जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी केली. त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी ही जागा आपल्यासाठी सोडली मात्र कालांतराने ही जागा आपण का घेतली असा प्रश्न मला पडला? कारण आपल्यातीलच काही लोक हे या जागेच्या विरोधात होते आणि काही लोकांनी ऐन वेळेस हात वर करून मदत करायचे नाकारले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आणि काही जवळच्या नेत्यांच्या जीवावर आपल्याला ही निवडणूक लढवावी लागली त्याचं मॅनेजमेंट करावा लागलं त्यात काय गोष्टी असतात या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी सांगू शकत नाही मात्र खूप त्रासानंतर जेव्हा आपण विजयी झालो तेव्हा तो आनंद अवर्णनीय आहे. सर्व समाजाच्या लोकांनी विशेषता अल्पसंख्याक समाजाने केलेल्या मतदानाच्या बळावरच आपण विजयी झालो त्यामुळे या सर्व मतदारांचे आपण जाहीर आभार व्यक्त करतो असे ॲड.ठाकूर म्हणाल्या. झब्बा पायजमा मधला आपला खासदार हा दिल्लीमध्ये आकर्षण होता आणि त्याचे आम्हाला खूप अप्रूप वाटत होते यापुढे बळवंत भाऊ आपल्या सर्वांसाठी निश्चितच काम करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी
आमदार ॲड. यशोमती ठाकूर( माजी मंत्री ), डॉ. सुनिलभाऊ देशमुख (माजी मंत्री), बबलुभाऊ शेखावत, विलासभाऊ इंगोले, किशोरभाऊ बोरकर, मिलींदभाऊ चिमोटे, भैय्या पवार, नसिमभाई खान, आसिफभाई तवक्कल, सचिनभाऊ हिवसे, जयश्रीताई वानखडे, रफ्फु पत्रकार, राम चव्हाण, निलेश गुहे, अंजलीताई ठाकरे, बंडुभाऊ हिवसे, पंकज मेश्राम, सलिम मिरावाले, ॲड. शोएब खान, विनोद मोदी, संजय वाघ, सागर यादव पाटील, अमर देशकर, गुड्डु हमिद, प्रशांत महल्ले, गजानन रडके, प्रमोद इंगोले, सतिष मेटांगे, राजेश वानखडे, विनोद गुडधे, शोभाताई शिंदे, सागर कलाने, गजानन राजगुरे, फिरोज शाह, भैय्यासाहेब निचळ, डॉ. मतिन अहमद, हमिद शद्दा, किरण साऊरकर, मुन्ना नवाब, विजय बर्वे, रविंद्र शिंदे, अनिक अहमद, अखिल बाबु, दिपक हुंडीकर, भाऊराव पोटे, विकासभाऊ धोटे, राजाभाऊ चौधरी, प्रकाश वानखडे, अमोल इंगोले, नितीन पवित्रकार, राजा बांगडे, विक्की वानखडे, राहुल बागडे, राजेंद्र शेरेकर, अरुण बनारसे, आरिफ खान, मिराज खान पठान, किशोर देशमुख, अजय गुल्हाने, नितीन लवंगे, दिनेश खोडके, किर्तीमाला चौधरी, अनिला काजी, रुबिना बाजी, शिरीन खान, डॉ. हसिना शाह, संगिता गावंडे, योगिता गिरासे, प्रभाताई आवारे, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here